Pmc Politics : भाजप-राष्ट्रवादी युतीची दाट शक्यता

Pmc Politics : पुणे महापालिकेत सत्तासमीकरणाचे वारे; उपमहापौर पदासाठी ‘डील’ची चर्चा
Pmc Politics : पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात एका मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेले भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आता पुणे महापालिकेतही अधिकृत युती करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या संभाव्य युतीमुळे महापालिकेतील सत्तासमीकरणे बदलणार असून, उपमहापौर पदावर राष्ट्रवादीचा डोळा असल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात रंगली आहे. ( pmc politics bjp ncp alliance news )

‘राज्यात एकत्र, मग महापालिकेत का नाही?’
राज्यातील महायुतीप्रमाणेच पुणे महापालिकेतही एकत्र येण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. भाजपमधून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एका बड्या नेत्याने या हालचालींना वेग दिला आहे. “जेव्हा राज्यात आपण एकत्र आहोत, तेव्हा महापालिकेत वेगळे राहण्याचे कारण काय?” असा भाजपमधून नुकतेच दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या नेत्याने उपस्थित केला आहे. ( Pmc Politics )
Moshi Garbage Depot : एएलआर कंपनीच्या प्रोजेक्ट हेड आणि सेफ्टी ऑफिसरला अटक
या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यासमोर सादर केला जाणार आहे. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यास, हा प्रस्ताव अधिकृतपणे भाजप नेतृत्वाकडे मांडला जाणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षात असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात काम करत होते. मात्र, आता ही मैत्री अधिकृत झाल्यास राजकीय चित्र पूर्णपणे पालटणार आहे. ( Pmc Politics )

Maharera : बिल्डर नागपाल यांना दणका: १ कोटी रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश
महापालिकेत राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. निकम म्हणाले, “पक्षाच्या हितासाठी आणि शहरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी जर असा प्रस्ताव असेल, तर आम्ही त्याचे स्वागत करू. पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दिल्यास, आमचे सर्व नगरसेवक त्या निर्णयासोबत ठामपणे उभे राहतील.”
दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या काही काळापासून महापालिकेत विरोधी बाकांवर बसूनही भाजपला पूरक भूमिका घेत होती. आता तर ते उघडपणे भाजपच्या गळ्यात गळा घालण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. ( Pmc Politics )

पुणे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष ठरली होती. आता जर राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला किंवा युती केली, तर महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद आणि इतर महत्त्वाच्या समित्यांवरील समीकरणे बदलतील. सध्या उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात असल्याची चर्चा आहे.
ATS Raid : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ATS ची छापेमारी
आगामी काही दिवसांत या हालचालींना अधिकृत स्वरूप प्राप्त होते का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या संभाव्य युतीमुळे पुणे महानगरपालिकेचे राजकारण कोणत्या वळणावर जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ( Pmc Politics )
A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)



