Pune Traffic: 1 ऑगस्टला शहरात वाहतुकीत मोठा बदल; ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग

Pune Traffic: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सारसबाग, स्वारगेट परिसरात वाहतुकीत मोठा बदल; ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग
पुणे, महाराष्ट्र मिरर
Pune Traffic: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) सारसबाग परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले असून, परिसरातील काही महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. pune traffic diversion annabhau sathe jayanti
वाहनचालकांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

हतुकीसाठी बंद राहणारे रस्ते आणि त्यांचे पर्यायी मार्ग:
१. देशभक्त केशवराव जेधे चौक ते सारसबाग (उड्डाणपुलासह):
बंद मार्ग: जेधे चौकातून सारसबाग व उड्डाणपुलावरून जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
पर्यायी मार्ग: सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकातून (ढोले चौक) डावीकडे वळून मित्रमंडळ चौक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामार्गे सिंहगड रस्त्याकडे जावे. कात्रजकडून येणाऱ्या वाहनांनी उड्डाणपुलावरून न जाता मित्रमंडळ चौकातून सिंहगड रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.

२. वेगा सेंटर ते सारसबाग समतल विलगक (ग्रेड सेपरेटर)
बंद मार्ग: स्वारगेट परिसरातील व्हेगा सेंटर ते सारसबागपर्यंतचा ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी बंद राहील.
पर्यायी मार्ग: वाहनचालकांनी घोरपडे पेठ, राष्ट्रभूषण चौक, हिराबाग, बाजीराव रस्तामार्गे आपल्या इच्छितस्थळी जावे.
३. स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते पूरम चौक
बंद मार्ग: सावरकर चौकापासून पूरम चौकाकडे जाणारी वाहतूक बंद असेल. Pune Traffic
पर्यायी मार्ग: स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, सिंहगड रस्ता, दांडेकर पूल चौक, नाथ पै चौक, ना. सी. फडके चौक, कल्पना हॉटेलमार्गे टिळक रस्ता व बाजीराव रस्त्या toward इच्छितस्थळी जाता येईल.
४. दांडेकर पूल व सिंहगड रस्त्याकडून सारसबागेकडे जाणारी वाहतूक:
बंद मार्ग: दांडेकर पूल आणि सिंहगड रस्त्यावरून सारसबागेकडे येणारी वाहतूक बंद राहील.
पर्यायी मार्ग: दांडेकर पूल, नाथ पै चौक, ना. सी. फडके चौक, कल्पना हॉटेलमार्गे टिळक रस्ता व बाजीराव रस्त्याकडे जावे.

वाहतूक नियमांतील तात्पुरते शिथिल व इतर बदल:Pune Traffic
पुरम चौक ते जेधे चौक: या दरम्यानच्या एकेरी वाहतुकीचे नियम गरजेनुसार व परिस्थितीनुसार तात्पुरते शिथिल करण्यात येणार आहेत.
दांडेकर पूल ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक: या मार्गावरील एकेरी वाहतूक गरज भासल्यास दुहेरी करण्यात येईल.
नीलायम चित्रपटगृह: येथून सारसबागेकडे येणारी वाहतूक पर्वती गावातून वळविण्यात येईल.Pune Traffic
शिवाजी रस्ता व शंकरशेठ रस्ता: या परिसरातील वाहतूक देखील गरजेनुसार पर्यायी मार्गाने वळवली जाईल.
पार्किंग व्यवस्था: वाहनचालकांच्या सोयीसाठी मित्रमंडळ चौकातील पाटील प्लाझा परिसरात वाहने पार्क करण्याची सोय करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/reel/DbafYwAtCkD/?igsh=MXgzbTlvYWRnNmtvNQ%3D%3D



