महाराष्ट्र

Pune Crime News पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कॅमेरे चोरीला

एक लाख रुपये किमतीचे कॅमेरा व लेन्स चोरीला

कॅमेरा व लेन्स सह एक लाखांचा मुद्देमाल लंपास

दौंड : नानविज येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून डिजिटल फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानातून सुमारे एक लाख रुपये किमतीचे कॅमेरा व लेन्स चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद दीपक शरद वराळे (वय ४३, व्यवसाय फोटोग्राफी, रा. नानविज पोलीस प्रशिक्षण केंद्र, न्यू ५० क्वार्टर्स लाईन, ता. दौंड) यांनी दिली अहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ रोजी रात्रीच्या दरम्यान ही चोरी झाली. फिर्यादी दीपक शरद वराळे (वय ४३, व्यवसाय फोटोग्राफी, रा. नानविज पोलीस प्रशिक्षण केंद्र, न्यू ५० क्वार्टर्स लाईन, ता. दौंड) यांच्या डिजिटल फोटो स्टुडिओ व झेरॉक्सच्या उघड्या दुकानात चोरट्याने प्रवेश केला. (maharashtra mirror)

चोरट्याने दोन कॅमेरे व साहित्य चोरल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चोरीला गेलेल्या साहित्यामध्ये सुमारे एंशी हजार रुपये किमतीचा कॅमेरा आणि वीस हजार रुपये किमतीची लेन्स यांचा समावेश आहे. एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी दि. १२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिस पुढील तपास करत आहेत. (Maharashtra mirror)

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button