देश-विदेश

Gurugram News : आईच्या डोळ्यादेखत कारने चिमुकलीला चिरडले; गुरुग्राममध्ये २ वर्षीय मुलीचा मृत्यू

Gurugram News : गुरुग्राम : घराबाहेर खेळणाऱ्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीला कारने चिरडल्याची हृदयद्रावक घटना गुरुग्राममध्ये घडली आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार चिमुकलीच्या आईच्या डोळ्यादेखत घडला. रात्रीच्या सुमारास गल्लीमध्ये खेळत असताना कार वळवताना चालकाच्या वाहनाखाली आल्याने चिमुकलीचा गंभीर अपघात झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.https://maharashtramirror.com/ Gurugram News

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास अधिरजा घराबाहेर गल्लीमध्ये खेळत होती. त्यावेळी तिची आई शेजारीच एका महिलेसोबत बोलत उभी होती. अचानक गल्लीमधून एक कार आली. कार वळवत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट चिमुकलीच्या अंगावरून गेली. या घटनेत अधिरजा गंभीर जखमी झाली.https://maharashtramirror.com/ Gurugram news

अपघातानंतर चालक कारमधून खाली उतरला. मात्र, चिमुकलीची अवस्था पाहून तो घटनास्थळावरून निघून गेल्याचे समोर आले आहे. आईने धावत जाऊन चिमुकलीला उचलून घेतले. तिने तातडीने मदतीसाठी धाव घेत मुलीला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.https://maharashtramirror.com/ Gurugram news

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामध्ये चिमुकली गल्लीमध्ये खेळताना आणि त्याचवेळी कार तिच्या अंगावरून जात असल्याचे दिसत आहे. घटनेनंतर चिमुकलीची आई आक्रोश करताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून, आरोपी नितीन यादव याला अटक करण्यात आली आहे. तो डेटा अॅनालिस्ट म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

चिमुकलीचे वडील वीरेंद्र तिवारी हे आयटी कंपनीत इंजिनिअर आहेत. त्यांनी डायल ११२ वर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. ‘‘आरोपीने मुद्दामहून गाडी चिमुकलीच्या अंगावर घातली नसावी. मुलगी वाचली असती तर तिच्या उपचारासाठी कितीही पैसा खर्च झाला असता, त्याची आम्हाला अडचण नव्हती; मात्र मुलीचा मृत्यू झाला,’’ अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली.

पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. वडिलांच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आरोपी नितीन यादवची चौकशी सुरू असून, अपघात नेमका कसा घडला आणि त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून का निघून गेला, याचा तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button