Yerwada Jail News | प्रतीक्षा संपली ! येरवडा कारागृह येथे कैद्यांच्या नातेवाइकांसाठी ‘प्रतिक्षालय’ : ADG अमिताभ गुप्ता यांची संकल्पना
- पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याकडून नातेवाईकांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न (Yerwada Jail News)
पुणे, दि. २३ मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Yerwada Jail News
येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये (Yerwada Jail News) शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईक, वकील यांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी पोलीस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता ADG Amitabh Gupta व विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर Spl. I.G. Dr. Jalindhar Supekar यांच्याकडून अत्याधुनिक सोयीयुक्त ‘प्रतिक्षालय’ निर्मितीचा संकल्प मांडण्यात आला होता. आज दि. २३ रोजी सायबेज आशा ट्रस्टकडून आत्याधुनिक सुसज्ज सोई-सुविधायुक्त प्रतिक्षालयाचे बांधकाम भूमिपुजन सोहळा अरुण नथानी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सायबेज Cybage व रितू नथानी, संचालिका सायबेज यांचे हस्ते पार पडला.
येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये सद्यस्थितीत सरासरी ६७०० बंदी विविध खटल्यामध्ये दाखल आहेत. दाखल बंदी संख्या लक्षात घेता, बंद्यांच्या भेटीसाठी येणा-या नातेवाईक व वकीलांची दैनंदीन संख्या जवळपास १४०० ते १५०० इतकी आहे. त्यानुसार भेटीस नातेवाईक व वकील यांचेसाठी सर्व सोई-सुविधा उक्त प्रतिक्षालय असणे आवश्यक होते.
अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतून व श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सायबेज आशा ट्रस्ट, पुणे या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यांच्या भेटीला येणा-या नातेवाईक व वकील यांचेसाठी आत्याधुनिक सुसज्ज सोई-सुविधायुक्त प्रतिक्षालयाचे बांधकाम भूमिपुजन सोहळा अरुण नथानी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सायबेज व श्रीमती. रितू नथानी, संचालिका सायबेज यांचे शुभहस्ते पार पडला. तसेच यापूर्वी सायबेज आशा ट्रस्ट यांचेमार्फत महिला बंदी व कारागृह महिला कर्मचारी यांचे मुलांसाठी ” नन्हे कदम” बालवाडी व ” हिरकणी कक्ष येथे संरक्षक भिंतीचे कुंपन व बगीचा यांचे बांधकाम करण्यात आले होते, तेथे देखील पाहणी करण्यात आली.
सदर भुमिपूजन सोहळ्यास सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे डॉ. भाईदास ढोले, उपअधीक्षक श्रीमती. पी. पी. कदम, एम. एच. जगताप, उपअधीक्षक, आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, सी. आर सांगळे, बांधकाम तुरुंगााधिकारी, शिवाजी पाटील, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२, सायबेज सॉफ्टवेअर कंपनीचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.