क्राईम न्यूज

Chhatrapati Sambhajinagar Crime News : तहसीलदारांनी जप्त केलेला हायवा चोरी : पोलीस उपनिरीक्षकावर संशय ?

छत्रपती संभाजीनगर :- अवैधरित्या गौण खजिनाचे वाहतूक करणारा एक हायवा तहसील पथकाने बुधवारी सकाळी पिसादेवी रोड येथे जप्त केला. तो हायवा तहसील कार्यालयात जमा केल्यानंतर गुरुवारी रात्री साडेआठ वाजता च्या सुमारास तो पळून नेण्यात आला आहे. जप्त केलेला हायवा सोडून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गोविंद अखिलवाले यांनी फोन करून हायवा सोडवण्यासाठी फोन केला होता. तसेच जप्त केलेला हायवा हा पळवून नेण्यासाठी त्याची यंत्रणा असावी असा संशय ग्रामीण तहसीलदार रमेश मुंदलोड यांनी व्यक्त केला आहे. Chhatrapati Sambhajinagar Crime News

शुक्रवारी पोलिसांत तक्रार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंदलोड यांनी सांगितले की, हायवावर कुठलाही नंबर नव्हता, हायवा सोडण्यासाठी पोलिस उपनिरीक्षकांच्या मोबाइवरून पथकातील कर्मचाऱ्यांना फोन आला होता. पथकातील कर्मचाऱ्यांनी हायवा सोडण्यास नकार दिल्यामले वाहनजप्त करण्यात आले. तहसील कार्यालयात आणून उभे करण्यात आले. परंतु, गुरुवारी त्याच उपनिरीक्षकांच्या चार ते पाच साथीदारांनी तहसील कार्यालयातील वॉचमनला धमकावून हायवा पळून नेला. हा सगळा प्रकार सुरू असताना ईव्हीएम मशीनच्या गार्डरूमसाठी तैनात असलेल्या पोलिसांना महसूल कर्मचाऱ्यांनी विनंती केली. मात्र, हे आमचे काम नाही असे सांगून त्यांनी हात वर केले Chhatrapati Sambhajinagar Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0