पुणेक्राईम न्यूज

Pune Crime News | येरवडा, विमानतळ, चतु:शिंगी, लोणीकंद येथील १२ गुन्हेगार तडीपार

  • गुन्हेगार पार्श्वभुमी असलेल्या १२ इसमांना पोलीस उपायुक्त यांनी केले तडीपार | Pune Crime News

पुणे, दि. २४ मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News | 12 criminals from Yerwada, Airport, Chatu:shingi, Lonikand Fugitive

येरवडा, विमानतळ, चतु:शिंगी, लोणीकंद परिसरातील रेकॉर्डवरील १२ गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हा येथून तडीपार करण्यात आले आहे. याबाबत परिमंडळ-४ पोलीस उपायुक्त यांनी आदेश काढले आहेत. Pune Crime News

येरवडा पोलीस स्टेशन कडील तडीपार आरोपी

१) हरजितसिंग ऊर्फ सोनु सरबजितसिंग सिंध्दु वय ४५ वर्षे, रा.स.नं.१९१ भंगार गल्ली नागपुरचाळ, येरवडा पुणे, २) विकास ऊर्फ महाराज भगत तौर, वय ३६ वर्षे, रा.स.नं.१२ क्षिरसागर हॉलमागे लक्ष्मीनगर येरवडा पुणे, ३) अजय गणेश राठोड, वय २४ रा.स.नं. १४ लाकडी वखारी जवळ जयजवाननगर येरवडा पुणे, ४) रुपेश दिलीप आडागळे वय २४ वर्षे रा.स.नं.१०३ माऊली चौकाजवळ जयप्रकाशनगर येरवडा पुणे ५) शंकर मानु चव्हाण, वय ५४ वर्षे, रा. स.नं.१४ पांडुलमाणवस्ती येरवडा, पुणे.

विमानतळ पोलीस स्टेशन कडील तडीपार आरोपी

६) बळीराम सुदाम पतंगे, वय २३ वर्षे, रा. दिनकर पठारे वस्ती, दुर्गा माता मंदिरा शेजारी, खराडी पुणे व ७) अरबाज असलम शेख, वय २२ वर्षे, रा.एस.आर.ए.बिल्डींग विमाननगर पुणे ८) योगेश प्रकाश म्हस्के, रा. गल्ली नं.४ यमुनानगर विमाननगर पुणे,

चतुश्रृंगी पोलीस स्टेशन कडील तडीपार आरोपी

९) गणेश यमनप्पा कुर्डेकरी, वय २४ वर्षे, रा. गल्ली नं.१ चाळ क्र.६ नेरेगल मठाजवळ, पांडवनगर, पुणे १०) सोमनाथ ऊर्फ सोम्या धोत्रे, वय ४५ वर्षे, रा. आकाश गंगा सोसायटी समोर, सार्वजनिक संडास शेजारी, वडारवाडी पुणे,

लोणीकंद पोलीस स्टेशन कडील तडीपार आरोपी

११) गौरव ऊर्फ महादु सातव वय ३३ वर्षे, रा. डोमखेल वस्ती आव्हाळवाडी ता. हवेली जि.पुणे, १२) महेंद्र संभाजी कुटे, वय ३८ वर्षे, रा. आव्हाळवाडी ता. हवेली, जि. पुणे यांचा समावेश आहे.

पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ मधील पोलीस स्टेशनचे गुन्हे अभिलेखावर खुन, खुनाचा प्रयन्त, जबरी चोरी, दरोडयाची तयारी करणे, ईच्छापुर्वक गंभीर दुखापत करणे, घरफोडी करणे, दुखापत करुन मारहाण करणे, महिलांवरील अत्याचार, बेकायदेशिर अग्निशस्त्र व प्राणघातक शस्त्र विनापरवाना जवळ बाळगणे, दहशत करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, चोरी व घरफोडी करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकार्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक रहावा म्हणून संबंधीत पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरुन पोलीस उप आयुक्त, परि ४ पुणे शहर यांनी प्रस्तावाची चौकशी पूर्ण करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ प्रमाणे ११ गुन्हेगारावर व कलम ५७ प्रमाणे ०१ गुन्हेगार असे एकुण १२ गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयातुन तडीपार आदेश केलेले आहेत.

सदर कारवाई Pune Police पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली करणेत आलेली आहे. यापुढील काळात देखील पोलीस उपआयुक्त परीमंडळ ४ हददीतील रेकॉर्डवरील क्रियाशिल गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतीबंधक कारवाई करुन गुन्हेगारीस प्रतिबंधक करणेकामी भर देण्यात येणार आहे.

Yerwada Jail News | प्रतीक्षा संपली ! येरवडा कारागृह येथे कैद्यांच्या नातेवाइकांसाठी ‘प्रतिक्षालय’ : ADG अमिताभ गुप्ता यांची संकल्पना

Pune Crime News | कोंढव्यात गुंडावर एमपीडीए कारवाई

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्र मिरर व्हाट्स अप चॅनेल सबस्क्राईब करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0