Pune DCP Transfer | पुणे शहर आयुक्तालयात पोलीस उपायुक्तांच्या बदल्या : DCP अमोल झेंडे वाहतुकीची धुरा सांभाळणार
- निखिल पिंगळे यांना गुन्हे शाखेची जबाबदारी | Pune DCP Transfer
पुणे, दि. १३ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune DCP Transfer
राज्यातील DCP संवर्गातील अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्यानंतर आता पुणे पोलीस आयुक्तालयात देखील पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे गुन्हे शाखेची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांना वाहतूक उपायुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर निखिल पिंगळे यांना उपायुक्त गुन्हे म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत काल दि. १२ ऑगस्ट रोजी Pune Police पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश काढले आहते.
उपायुक्त यांच्या नियुक्त्या पुढील प्रमाणे –
१. अमोल झेंडे DCP Amol Zende – पोलीस उपायुक्त गुन्हे ते पोलीस उपायुक्त वाहतूक
२. राजकुमार शिंदे DCP Rajkumar Shinde – पोलीस उपायुक्त विशेष शाखा ते पोलीस उपायुक्त मुख्यालय
३. जी. श्रीधर DCP G. Shridhar – पोलीस अधीक्षक हिंगोली ते पोलीस उपायुक्त विशेष शाखा
४. निखिल पिंगळे DCP Nikhil Pingale – पोलीस अधीक्षक गोंदिया ते पोलीस उपायुक्त गुन्हे
Web Title : Pune DCP Transfer | Transfer of Deputy Commissioner of Police in Pune City Commissionerate: DCP Amol Zende will be in charge of traffic