Mira Road Crime News : ऑनलाईन फसवणुकीतील रक्कम परत मिळून देण्यास यश, सायबर विभागाची कामगिरी

•ऑनलाईन फसवणुकीतील मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दोन प्रकरणातील पैसे परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश
मिरा रोड :- ऑनलाइन फसवणुकीतील दोन प्रकरणातील पैसे परत मिळून देण्यास मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील सायबर विभागाची यशस्वी कामगिरी केली आहे. दोन्ही प्रकरणातील एकूण 98 हजार 960 रुपये परत मिळून देण्यास पोलिसांना यश आले आहे. मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आस्था अग्रवाल यांना व्हाट्सअप वर लिंक प्राप्त झाली. ती लिंक ओपन केल्यानंतर अग्रवाल यांच्या खात्यातून 48 हजार 960 रुपये कट झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला होता. त्यांनी जून 2023 रोजी सायबर विभागाला आपली तक्रार दाखल केली होती

अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे मधुकर केदार यांना हॉटेल रेटिंग च्या ग्रुप टास्कमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांना पैशाचा नफा देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु पैसे गुंतवणूक त्यानंतर कोणत्याही प्रकारे परतावा न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आपली तक्रार ऑनलाईन नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर दाखल केली होती. त्यांच्या या गुंतवणुकीमध्ये 50 हजाराचे फसवणूक त्यांच्यासोबत झाली होती. या दोन्ही प्रकरणातील सायबर विभागाने सखोल चौकशी केली असता तांत्रिक विश्लेषणाने या दोन्ही प्रकरणातील तक्रारदारांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यावर वळती गेली होती.
सायबर विभागाने तात्काळ ती रक्कम गोठविण्याकरिता पोलिसांनी पत्रव्यवहार करून ती रक्कम न्यायालय आणि संबंधित बँकेचे पत्र व्यवहार करून फसवणूक झालेल्या तक्रारदारांच्या मूळ खात्यावर परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे. यामध्ये पोलिसांनी आस्था अग्रवाल यांच्या मूळ खात्यावर 48 हजार 960 रुपये तर मधुकर केदार यांचे 50 हजार रुपये परत मिळवून देण्यास यश आले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार पल्लवी निकम, स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार ओंकार डोंगरे, कुणाल सावळे यांनी पार पाडली आहे.