Marathi Bhasha Gaurav Din : विवा महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” दिमाखात साजरा..
विरार: मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे . या मातृभाषेचा गौरव म्हणून व ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कुसुमाग्रज. त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्य विश्वात दिलेले योगदानाची दखल घेत त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून देशभरात हा दिवस “मराठी भाषा गौरव दिन” Marathi Bhasha Gaurav Din म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून विवा महाविद्यालयातील Viva College Virar मराठी वाड.मय मंडळ व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “मराठी भाषा गौरव दिन ” अगदी दिमाखात साजरा करण्यात आला.
मराठी भाषा गौरव दिना निमित्त “मराठी भाषा आणि माध्यमे” Marathi Bhasha Gaurav Din या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बीएएमएमसी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक महेश जगताप यांना निमंत्रित करण्यात आले होते. मराठी भाषेचे महत्व, माध्यमांमध्ये मराठी भाषेचे महत्व, भाषेमुळे व्यक्तीवर होणारे संस्कार, मातृभाषा आणि माध्यम संस्कृती, भाषा आणि माध्यमे यांचे नाते संबंध, माध्यमात करिअर म्हणून असलेल्या भविष्यातील संधी, इत्यादी यांसारखे मुद्दे व्याख्यानात मांडण्यात आले.
मराठी वांङ्मय मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘पुस्तक परीक्षण’ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पु.ल. देशपांडे, सिसीलिया कर्व्हालो यांसारख्या प्रसिध्द साहित्यिकांच्या पुस्तकांचे परीक्षण सादर करीत, त्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. ग्रंथालय विभागातर्फे विभाग प्रमुख नागरत्ना पलोटी यांनी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व कर्मचारी स्पर्धेत विजेते, ग्रंथालय विभाग व समितीतील सदस्याचे असलेले योगदाना बद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.
इंग्रजी माध्यम विभाग प्रमुख डॉ. विद्या वर्मा, मानसशास्त्र विभाग प्रमुख रश्मी सावंत, राज्यशास्त्र विभाग प्रमुख विजया शिरसाट व अन्य प्राध्यापक वर्ग मान्यवर मंडळी उपस्थित होते.
ग्रंथालय विभागप्रमुख डॉ.नागरत्ना पलोटी , मराठी वाड.मय मंडळाच्या कार्यवाहक कविता पाटील, वांङ्मय मंडळ समिती, ग्रंथालय समिती यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वि. श. अडीगल, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, उपप्राचार्या डॉ. दीपा वर्मा ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्रसिद्ध : प्राचार्य, विवा महाविद्यालय यांच्या कार्यलयातून प्रसिद्धीसाठी