क्राईम न्यूज

Illegal Liquor Scam : राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या मेहरबानीने अवैध मद्य विक्री फोफावली ; डुप्लीकेट मद्य विक्री बाबींकडे दुर्लक्ष

दौंड, ता. २ तालुक्यात असंख्य बार – परमिट रूम झालेले आहेत. पुणे – सोलापूर रोड असो किंवा तालुक्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात बार – परमिट रूमचे पेव फुटले आहे. हाॅटेल्सला जोड व्यवसाय म्हणून बार – परमिट रूम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या सर्व बार – व परमिट रुमची तपासणी व त्यावर लक्ष ठेवण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आहे. अनेक बार – परमिट रूममध्ये ठरल्यापेक्षा जास्त चार्चस घेऊन ग्राहकांची लुबाडणूक सुरू आहे. तर काही बार – परमिट रुममध्ये डुप्लीकेट मद्य विक्री केली जात असल्याचे वृत्त आहे. Illegal Liquor Scam

अनेक जणांनी बार परमीट रुममध्ये मद्य व बियरचे ठरलेल्या रेट पेक्षा जास्तीचे चार्ज उघड – उघड घेतले जातात. ग्राहकांना पक्के बिले दिले जात नाही. कच्च्या कागदावर बिले दिले जातात, यामुळे अनेक बारमध्ये या माध्यमातून भ्रष्टाचार सुरू आहे. रेकाॅर्डसाठी डुप्लीकेट बिले बनवली जातात ती काॅम्प्युराईज केले जातात व उत्पादन शुल्क खात्यासाठी हिशोब व मेळ बसवला जातो हे उघड सत्य आहे. Illegal Liquor Scam

दुसरा प्रकार म्हणजे ग्राहक टेबलावर बसताच त्या ग्राहकाला शुद्ध पाणी देणे क्रमप्राप्त असतांना सदर ग्राहकांच्या समोर २० रुपययांची पाणी बाॅटल घेण्याची जणू सक्तीच केली जाते. बारमध्ये चालणाऱ्या अनेक अनागोंदी गोष्टी आहेत ज्यामध्ये ऑरिजनल मद्याच्या आडून काही ठिकाणी डुप्लीकेट मद्य विक्री केली जात आहे. या सर्व बाबींकडे उत्पादन शुल्क खाते जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहे ? याचा शोध घेतला असता अनेक बार – परमिट रूम चालकांकडून तसेच अवैध मद्य विक्री करणाऱ्यांकडून पद्धतशीरपणे अर्थ पुरवठा संबंधितांना सुरू असतो. या खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी किती ठिकाणी छापे घातले ? हे ऐकिवात नाही, उत्पादन शुल्क खात्याकडून कधीही प्रेसनोट जारी होत नाही किंवा पञकारांना बोलावून एखादी बातमी दिली जात नाही. मग प्रश्न पडतो की उत्पादन शुल्क अधिकारी कर्मचारी आपले कर्तव्यच विसरले काय ? असा हि प्रश्न जनमाणसांतून उपस्थित होत आहे. आता तरी उत्पादन शुल्क विभाग जागे होणार काय ? व संबंधितांवर कारवाई करणार काय ? हाच प्रश्न आहे Illegal Liquor Scam

राज्य उत्पादन शुल्क खाते तेरी भी चूप मेरी भी चूप प्रमाणेच वागतांन दिसत आहे. यामुळे जनसामान्यांतून तिव्र नाराजी व्यक्त होत असून कुंपनच शेत खात असल्याचा हा कारभार सुरू असल्याचे दिसते. अनेक ग्राहकांनी, शौकींनांनी या बाबत आवाज उठवण्यासाठी आग्रह केला म्हणून हा खटाटोप. Illegal Liquor Scam

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0