पुणे
Trending

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांचा कॉल रेकॉर्ड चांगलाच व्हायरल

Supriya Sule Call Get Viral – कार्यकर्त्यांना तुतारीचा प्रसार करण्यास सांगितले, कार्यकर्त्याने अजित पवार यांचा प्रचार करत असल्याचे सांगितले

पुणे :- खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांचे एक ऑडिओ कॉल रेकॉर्डीग सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यात सुप्रिया सुळे आपल्या तुतारी चिन्हाचा प्रचार करताना मतदाराशी संवाद साधत आहेत. यावेळी सुप्रिया सुळेंशी फोनवर बोलणारा व्यक्ती काहीसा थोडासा दबावात असल्याचे वाटते. अखेर, तो सुप्रिया सुळेंना स्पष्टपणे सांगतो की, ताई आम्ही वहिनींचे काम करत आहोत, आम्ही दादांसोबत आहोत. सध्या सोशल मीडियावर हे कॉल रेकॉर्डीग चांगलेच व्हायरल होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सुप्रिया सुळे Supriya Sule स्वतः हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मतदारांना फोन करत आहेत. त्यात त्यांना मजेशीर अनुभव येत आहेत. त्यांचे यासंबंधीचा एक फोन कॉल चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोनमध्ये सुप्रिया सुळे आपले तुतारी चिन्ह गावात पोहोचले का? असा प्रश्न करत आहेत. त्यावर समोरील व्यक्ती त्यांना मी तुतारीचा नव्हे तर दादांचे काम करत असल्याचे प्रत्युत्तर देताना ऐकू येत आहे.

अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीची 2 शकले पडली आहेत. त्यातच आता बारामती लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule व उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोघीही आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. विशेषतः सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवणारा माणूस हे आपले चिन्ह असल्याचे सांगत प्रचारही सुरू केला आहे.

सुप्रिया सुळे यांचा कॉल रेकॉर्ड व्हायरल (Supriya Sule Viral Video Call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0