शैक्षणिकमुंबईसंपादकीय
Trending

Janta College Khopoli : २६ वर्षाने साजरा केला जनता विद्यालय खोपोली ( लव्हेज ) दिल दोस्ती दुनियादारी ९७-९८ बॅचचा स्नेहसंमलन उत्साहात संपन्न ; जुन्या आठवणींना दिला उजाळा..!!

गडब / अवंतिका म्हात्रे : वयाची ४० शी पार झाली तरीही मैत्रीच नात काही वेगळच असत २६ वर्षाची मैत्री ही अशीच असते आपुलकी जिव्हाळा काहीही नाते नसताना निर्माण होणारे नात म्हणजे मैत्री . जुन्या आठवणींना उजाळा देणारे अतुट नाते म्हणजे मैत्री .

१ डिसेंबर २० २४ रोजी जनता विद्यालय लव्हेज इयत्ता १०वी ची दिल दोस्ती दुनियादारी

९७-९८ च्या ग्रुपचा स्नेहसंमेलन कर्जत वर्णे येथील नक्ष फार्म हाऊस येथे उत्साहात पार पडला . सदर कार्यक्रमाचे सुत्र संचलन मंगेश सुखदरे याने आपल्या सुमधुर आवाजाने गणेशाच्या गाण्याने सुरुवात केली तसेच कार्यक्रमाची रूपरेषा प्रदीप देशमुख वैशाली जाधव माधुरी मोरे यांनी केली . सुरुवातीला सर्व मित्र मैत्रिणींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व केक कापुन स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली नंतर प्रत्येकाने आपआपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला . जुन्या आठवणींना उजाळा देताना सर्वांनी अतिशय विस्मणीय आठवणी मांडल्या . नंतर प्रत्येकाला भेटवस्तु देऊन कार्यक्रमाला उजाळा दिला व मुलींनी हळदीकुंकु समारंभ करून हुकाने घेऊन हळदीकुंकवाची शोभा वाढवली . तद नंतर सर्वांनी हास्य विनोद करत स्नेहभोजन केले . दोस्तीच्या गाण्यांवर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधुरी मोरे वैशाली जाधव मंगेश सुखदरे प्रदिप देशमुख अनिल मोरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली .

२६ वर्षाने भेट होणार या क्षणाची सर्वांना अतुरता होती त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणुन सर्वानी वेळात वेळ काढून सर्वांनी मैत्रीचे अतुट नाते जपले आणि अशीच ही आपली दिल दोस्ती दुनियादारी पुढेही कायम जपणार असल्याचे सांगितले .
सदर स्नेहसंमलनाला माधुरी मोरे वैशाली जाधव,प्रदीप देशमुख,मंगेश सुखदरे,प्रविण देशमुख,रेखा बांद्रे,नीलिमा घाडगे,करुणा सरोते, नलिनी ठोंबरे,सीमा देशमुख,निलेश पालांडे,चंदन घोसाळकर,अनिल मोरे,संदीप हडप,मारुती घोलप,दिनेश देशमुख,रोहिणी जाधव
सविता खंडागळे,योगेश्वरी खारमिसे
अवंतिका पाटील,सपना गंभीर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0