Virar Crime News : सराईत दुचाकी आणि ऑटोरिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद
माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश,दुचाकी आणि ऑटो रिक्षा चोरीचे 04 गुन्हे उघडकीस आणुन रु. 2 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त.
विरार :- सराईत दुचाकी आणि ऑटोरिक्षा चोरी करणार आरोपीला केले अटक करुन जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. माणिकपुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 16 एप्रिल रोजी तक्रारदार दिलीपकुमार विजु मकवाना, (43 वर्षे) रा. रुम नं. ७०४, भामनी संकुल, टिवरी रोड, नायगांव पूर्व, जि. पालघर यांनी त्यांची हिरो कंपनीची स्ट्रिट मोटारसायकल ही नायगांव रेल्वे स्टेशन पश्चिम येथे सार्वजनिक रोडचे कडेला उघडयावर पार्क करुन ठेवली असता कोणीतरी अज्ञात इसमाने स्वतःचे फायदयाकरीता चोरी केल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कलम 379 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सि.सि.टि.व्ही. कॅमेरे व गुप्त बातमीदार व तांत्रिक मदतीने आरोपी नामे 1) मोहम्मद सैबाज मोहम्मद हानिफ मनिहार, (24 वर्षे), तुलसी नगर चाळ, टेकडी मस्जिदच्या बाजुला, बावशेतपाडा,वसई यास त्याचे राहते घराचे परीसरामध्ये सापळा लावुन शिताफीने पकडले व त्यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान अटक आरोपीत याचेकडून रु. 2 लाख किंमतीच्या 03 दुचाकी व 01 ऑटो रिक्षा हस्तगत करुन 04 गुन्हयांची उकल करण्यात आली आहे.
पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले/श्रिगी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 02, पद्मजा बडे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई, राजु माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,संतोष चौधरी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, पोलीस हवालदार धनंजय चौधरी, पोलीस शिपाई गोविंद लवटे, आनंदा गडदे, पोलीस शिपाई प्रविण कांदे, महिला पोलीस शिपाई पूजा कांबळे, व पोलीस उप आयुका कार्यालय, परिमंडळ 02 चे पोलीस हवालदार भालचंद्र बागुल, पोलीस शिपाई अमोल बर्डे, मोहन खंडवी यांनी यशस्विरीत्या पार पाडली आहे.