Amit Shah : राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट!

Amit Shah Latest News : मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री बावनकुळे यांची साथ,आरोग्यसेवा प्रकल्पाच्या गतीने मंत्री शहा ‘समाधानी’
नागपूर : देशातल्या आरोग्य क्षेत्रात एक महत्वाची पाऊल टाकत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नागपूर येथील राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटची पाहणी केली. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती होती. देशात कर्करोगाविरुद्ध लढा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या या महत्त्वाच्या संस्थेतील आरोग्यसेवा सुविधा, उपचार प्रणाली आणि रुग्ण सेवांचा आढावा मंत्री शहा यांनी घेतला.
यावेळी शहा यांनी संस्थेतील विविध विभागांना भेट देत डॉक्टरांशी संवाद साधला आणि उपचारांबाबतची माहिती घेतली. केंद्र सरकारकडून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी या संस्थेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.



राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूट’ बनतेय उपचाराचा केंद्रबिंदू
राज्यातील आणि देशातील रुग्णांसाठी हा प्रकल्प एक वरदान ठरत असून, येथे रेडिएशन, केमोथेरपी, सर्जरी अशा सर्व उपचार सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. नागपूरसारख्या मध्यवर्ती शहरात ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विदर्भ आणि शेजारच्या राज्यांतील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आरोग्य हेच राष्ट्राचे खरे सामर्थ्य – अमित शहा
“आरोग्याच्या क्षेत्रात गुंतवणूक ही देशाच्या भविष्याची गुंतवणूक आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर वेळेवर आणि दर्जेदार उपचार उपलब्ध होणे ही केंद्राची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असे यावेळी शहा म्हणाले. त्यांच्या या दौर्यामुळे नागपूर व विदर्भातील आरोग्य क्षेत्राला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


