Thane Crime News : बेकायदेशीर हत्यार बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी एक आरोपीला केले अटक
Thane Crime News Thane Wagle Police Arrested Person With 2 Gun : 2 गावठी पिस्टल ( बंदूक), 4 जीवंत काडतुसेसह तरुणाला ताब्यात
ठाणे :- राज्यात लोकसभेचे Lok Sabha Election बिगुल वाजले आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुका जाहीर झाल्या असून आता दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या टप्प्यातील निवडणुका लवकरच पार पाडणार आहे. मुंबईचा ठाणे रायगड नाशिक येथे पाचवा टप्प्यात म्हणजेच 20 मे ला मतदान होणार आहे. आता सध्या महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर समजले जाणारे मुंबई ठाणे येथे इतरत्र उमेदवार जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असताना शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी चांगलेच कंबर कसली आहे. यंदाची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची समजली जात असून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना लागणार आहे. त्यामुळे शहरात कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून शहरातील बेकायदेशीर धंद्यांवर बारकाईने नजर ठेवून आहे. एका तरुणाला वागळे इस्टेट पोलिसांनी दोन गावठी पिस्टल (बंदूक) चार जिवंत काडतुसे सह तरुणाला ताब्यात घेतले आहे. Thane Crime News
गुन्हे शाखा, घटक-5, वागळे चे पोलीसांना मिळालेल्या माहिती वरून, श्रेणी पोलीस निरीक्षक अहिरे, पोलीस हवालदार रावते व त्यांचे पथकाने, 22 एप्रिल रोजी 1.35 वा.चे सुमारास, नटवर हॉटेलसमोर, फुटपाथवर, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम येथे आरोपी शेर नवबहादुर कारकी, (27 वर्षे) (रा.बहादुरगढ, हरियाणा) राज्य यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यात 2 गावठी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र), 4 जिवंत काडतुस व इतर असा मुद्देमाल मिळुन आला. सदर प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अहिरे हे करीत आहेत. Thane Crime News