Virar Crime News : लहान मुलांच्या मदतीने लग्न समारंभात चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

Virar Latest Crime News : पोलिसांनी लग्न आणि तत्सम कार्यक्रमांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून आरोपीला मुद्देमालासह मध्य प्रदेश राज्यातून अटक केली आहे.
विरार :- लहान मुलांच्या मदतीने लग्न समारंभ आणि तत्सम कार्यक्रमांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश दावा पोलिसांनी Virar Police News केला असून पोलिसांनी आरोपीला मध्य प्रदेश राज्यातून अटक केली असून त्यांनी चोरी केलेल्या मुद्देबाल जप्त केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 फेब्रुवारी रोजी विरार पश्चिम येथील ओल्ड विवा कॉलेजच्या पाठीमागील मैदानातील मीनल रमाकांत पाटील (52 वय) यांच्या मुलीच्या लग्न सोहळा चालू असताना वधू आणि वरास नातेवाईकाकडून देण्यात आलेल्या आहेर (पैशाचे पाकीट) आठ लाख रुपये रोख आणि तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अशी बॅग स्टेजवरून लंपास झाली होती. त्याबाबत फिर्यादी यांनी बोळींज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कलम 303(2),61(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी अज्ञात आरोपींचा तपास करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या. मैदानात सीसीटीव्ही नसल्यामुळे आरोपींना शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते. गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय बातमीदारा मार्फत आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच इतर राज्यातही विविध लग्न समारंभा त चोरी करणाऱ्या टोळी पोलिसांना निदर्शनास आली. पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत घटनेच्या वेळी गुन्हा घडलेल्या आरोपी हे मध्य प्रदेश राज्यातील असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. पोलिसांचे पथक मध्य प्रदेश राज्यात चोडा पोलीस ठाणे यांच्या मदतीने सतत 11 दिवस गुन्ह्यातील आरोपीचा मागवा घेऊन एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विकास कुमार रामजी लाल सोसोदिया (सासी) (34 वय) याला अटक केली असून पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात चोरी केलेल्या मुद्देमाला पैकी सात लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच आरोपीला अटक करून बोळींज पोलीस ठाण्यात पुढील चौकशी करिता अन्य झाले आहे.
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, दत्ताञय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय, जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-03, विरार, विजय लगारे, सहाय्यक पोलीस आयुक्त, नालासोपारा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली बोळींज पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे, पोलीस निरीक्षक,प्रकाश सावंत (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी, विष्णु वाघमोडे, स.फी. जनार्दन मते, पोलीस हवालदार किशोर धनु, पोलीस अंमलदार संदिप शेळके, रोशन पुरकर, प्रफुल्ल सरगर, सुखराम गडाख, तांत्रिक मदत पोलीस हवालदार नामदेव ढोणे पोलीस अंमलदार सोहेल शेख ,परिमंडळ-3 विरार कार्यालय यांनी केलेली आहे.