संघटीतपणे गंभीर गुन्हे करणा-या सराईत अंतरराज्यीय टोळीवर मोक्का अंतर्गत गुन्हे शाखा, कक्ष- 3 विरार कडुन कारवाई
विरार :- दरोडयाची पूर्वतयारीत असलेले आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. कुख्यात अंतरराज्यीय टोळीतील आरोपी नामे 1) मनिष ऊर्फ राजु मोहन चव्हाण, वैजापुर, जि. औरंगाबाद. 2) भाऊसाहेब शंकर गवळी, नेवासा, जि. अहमदनगर. 3) रविंद्रसिंग सुखराम सोलंकी, रा. जि. गुणा, राज्य मध्यप्रदेश, 4) सुखचेन रेवत पवार, रा. जि. गुणा, राज्य मध्यप्रदेश, 5) मॉन्टी नंदू चौहान, जि. गुणा, राज्य मध्यप्रदेश 6) अश्विनी रुपचंद चव्हाण, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर यांना गुन्हे शाखा कक्ष -3 चे अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई करुन ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द विरार पोलीस ठाणे येथे कलम, भा.दं.वि. सं. कलम 399, 402, 353, 332 सह आर्म ॲक्ट 4, 25, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3), 137 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. Virar Crime News
आरोपीत यांनी संघटीतपणे टोळी तयार करुन महाराष्ट्र राज्यातीलू, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, तसेच मध्यप्रदेश व राजस्थान परिसरात खून, खुनासह दरोडा, सशस्त्र दरोडा, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, घर फोडी, चोरी असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले असुन आरोपी नावे 1) सुखचेन रेवत पवार, 2) रविंद्रसिंग सुखराम सोलंकी हे सन 2018 पासुन राजस्थान व मध्यप्रदेश येथील दरोडयाच्या गुन्हयात फरार इनामी गुन्हेगार असुन सदर गुन्हयाचे तपासात नमुद अटक आरोपीत यांचे कडुन पोलीस कोठडी दरम्यान मालमत्ते संदर्भाचे 7 गुन्हे उघडकीस आले आहे. Virar Crime News
आरोपी यांचे विरुध्द 29 फेब्रुवारी 2024 रोजी श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे परवानगीने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) अशी कलम वाढ करण्यात आली असुन उक्त गुन्हयाचा तपास मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हे करीत आहे. Virar Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त साो., (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे प्रविण वानखेडे गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-३ तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सायबर सेल यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे,