मुंबई

Mumbai Crime News : स्वतःच्या संरक्षणाकरिता उत्तर प्रदेश मधील परवाना असलेले बंदूक जवळ बाळगणाऱ्या तीन व्यक्तींना अटक

गुन्हे शाखा, कक्ष-6, मुंबई यांनी तीन व्यक्तींना ताब्यात घेवून त्यांचेकडून तीन अग्नीशस्त्रे ताब्यात घेवून कार्यवाही

मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर Abhishek Ghosalkar यांच्यावर गोळीबार नंतर मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर रित्या बंदूक बाळगणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जात आहे. तसेच ज्यांच्याजवळ शासनाचे प्रमाणे असलेले बंदुकी आहेत त्यांची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे परंतु उत्तर प्रदेशातील परवाना असलेला बंदूक बाळगणाऱ्या तीन व्यक्तींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा-6 अटक केली आहे. Mumbai Crime News

29 फेब्रुवारी 2024 रोजी कक्ष-6, मुंबई येथील पोलीस शिपाई इंगळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नेहरूनगर, कुर्ला पूर्व, मुंबई या ठिकाणी तीन इसम हे त्यांची अग्निशस्त्रे ही स्वताचे संरक्षणासाठी असुनही त्यांनी ती पैसे कमविण्याचे उददेशाने त्यांचेकडे कोणताही खाजगी सुरक्षा पुरविण्याचा परवाना नसताना तसेच त्यांची कोणतीही खाजगी सुरक्षा एजन्सी नसताना देखील त्यांनी सदरची अग्निशस्त्रे ही अन्य खाजगी इसमांच्या सेवेसाठी तसेच व्यवसायिक कारणासाठी वापरतात, अशा आशयाची माहिती प्राप्त झाल्यानुसार वरिष्ठांचे आदेशाने त्रिवेणी बार समोर, कुर्ला येथे सापळा लावला असता सदर ठिकाणी 1) अनिलकुमार विजय नारायण मिश्रा, (53 वर्षे), 2) राजकुमार लालता सिंग, (52 वर्षे) 3) देवनारायण हरीराम जैस्वाल, (48 वर्षे), सर्व रा. मुळ उत्तरप्रदेश हे आल्यावरुन त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपूस केली असता, Mumbai Crime News

नमूद तीन इसमांकडे उत्तर प्रदेश येथील परवाना असलेली अग्निशस्त्रे असुन सदरच्या वैयक्तिक संरक्षणासाठी दिलेली अग्निशस्त्रे ही त्यांचेकडे खाजगी सुरक्षा पुरविण्याचा परवाना नसताना देखील बॉडीगार्ड सारखी खाजगी इसमांना सुरक्षा पुरविण्यासाठी वापरण्यासाठी आले व मुंबई व ठाणे परिसरात साधारणपणे 10 वर्षापासून राहत असूनही नमूद इसमांनी त्यांचे शस्त्र परवान्याबाबतची नोंद अथवा पत्ता मुंबई शहरामध्ये बदल केला नसून ते राहत असलेल्या पत्याबाबत व ते व्यवसाय करत असलेल्या ठिकाणावे पत्त्याबाबत नजीकच्या परवाना देणा-या प्राधिकरणाला माहिती न देता शस्त्र अधिनियम कायदयाचे अटी व शर्थीचे उल्लंघन केले म्हणुन त्यांचे विरोधात कलम 30 शस्त्र अधिनियम 1959 अन्वये नेहरूनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात करण्यात आला असून कक्ष ६ कडील पोउपनि सुभाष मुठे सदर गुन्हयाचा पुढील तपास करीत आहे. Mumbai Crime News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (CP Vivek Phansalkar), विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण-1) विशाल ठाकूर व सहाय्यक पोलीस आयुक्त (डी पुर्व) चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष 6 वे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुठे, पोलीस उपनिरीक्षक सावंत, सहाय्यक फौजदार देसाई, पोलीस हवालदार शिंदे, चव्हाण, पोलीस शिपाई इंगळे, कोळेकर, घेरडे, पाटील यांचे पथकाने पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0