Uncategorized

Work From Home Scam : वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाईन फसवणूक

Online Job Fraud : – यु टुब व्हिडीओ लाईक , ऑनलाईन हॉटेल मुव्ही रेटींगमध्ये गुतंवणुक करण्यास सांगुन केलेल्या फसवणुकीतील रक्कम 7 लाख 90 हजार रुपये पैकी 7 सात रुपये तक्रारदार यांना परत करण्यात काशिमीरा पोलीस ठाण्यास यश.

मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पोलीस स्टेशन परीसरात राहणाऱ्या , जिगना मेहता, (47 वर्षे) वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाईन यु टुब व्हीडीओ लाईक स्टारक, ऑनलाईन हॉटेल/मुव्ही रेटींग यांना लाईक अथवा गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवुन फिर्यादी यांना सात लाख रुपयाची फसवणुक झाली होती Work From Home Scam. सदर फसवणुकीच्या अनुषंगाने काशिमीरा पोलीस स्टेशन येथे भादंवीस कलम 420,34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनीयमकलम 66 (सी), 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

तक्रारी बाबत तात्काळ गुन्हा दाखल करुन घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाचत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळ्या बैंक खात्यात वळती झाल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाचत संबंधीत बैंकेसोबत पत्रव्यवहार करन संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली, त्यानंतर न्यायालयाकडून तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्या करीता काशिमीरा पोलीस ठाणेचे अधिकारी अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणुक झालेली संपूर्ण रक्कम 07 लाख रुपये त्यांचे खात्यावर परत मिळविण्यात आली आहे. Work From Home Scam

पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01, मिरा रोड, विजय कुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक निखील चव्हाण, पोलीस हवालदार दिनेश आहेर यांनी पार पाडली आहे. Work From Home Scam

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0