मुंबई

Vasai Crime News : वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश ; सराईत वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक

•Vasai Crime News बारा लाख 25 हजार किमतीचे मुद्देमाल पोलिसांनी केले हस्तगत, आरोपीवर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद

वसई :- वसई विरार परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून वाहन चोरीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहेत. अशीच एक घटना वाळू पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पॅलेस बिल्डिंगच्या बाहेरील फिर्यादी यांची हुंडाई कंपनीची दुचाकी 20 मे ते 21 मे दरम्यान रात्रीच्या वेळी चोरीला गेली होती. फिर्यादी अब्दुल मलिक अस्लम मणिहार याने अन्य आरोपींच्या विरोधात वायू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेताच चोरीच्या घटना आटोक्यात आणण्याकरिता पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांनी सहाय्यक पोलीस उपायुक्त उमेश माने पाटील तुळस विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज्वारे वाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शन व सूचनानुसार वाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्हीच्या फुटेज व गुप्त बातमीदाराच्या मदतीने घटना घडली त्यावेळी चे सर्व सीसीटीव्ही पाहता पोलिसांना एक आरोपी आढळून आला. सदर आरोपी हा धुमाळ नगर वसई पूर्व परिसरात रामसिंग उदयसिंह परमार (22 वर्ष), याला वाली पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी याच्याकडे सकल चौकशी केली असता पोलिसांना मोटार कार आणि एक एक्टिवा मोटरसायकल असे जवळपास 12 लाख 25 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने यापूर्वी अशाच प्रकारे गुन्हा केल्याचे आपल्या कबुलीत म्हटले आहे.

पोलीस पथक
पौर्णीमा चौघुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ 2 वसई, उमेश माने पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, वालीव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, पोलीस अंमलदार विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0