मुंबईक्राईम न्यूज

Vasai Crime News : वालीव पोलिसांची कामगिरी ; तोतया पोलिसाचा केला पर्दाफाश

•Vasai Crime News तोतया पोलीस निरीक्षक असल्याचे सांगत लोकांची करायचा लुट, पोलिसांनी आरोपीला केले अटक, आरोपीकडे पोलिसांसंदर्भात 30 वस्तू आढळल्या

वसई :- वालीव पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत तोतया पोलिसाला अटक केली आहे. या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली असून आरोपी तो त्या पोलिसांकडून पोलिसांच्या जवळ असणाऱ्या 30 हुन अधिक वस्तू सापडले आहे. पोलीस विभागाची ओळखपत्र तसेच स्कॅन करून तयार केलेले पोलीस शिपाई पदाच्या नियुक्तीपत्र पोलिसांच्या तपासात आढळून आले आहे.

तोतया पोलिसाचा उलगडा कसा झाला
ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखा यांच्याकडे माय महेंद्रकुमार हेमाराम पुरोहित याच्या मोबाईल विक्रीचा याच्या मोबाईल विक्रीचा धंदा व्यवसाय असून त्याच्या दुकानातील एका पुरुषाने एक लाख 60 हजार किमतीचा गॅलेक्सी शेड फोल्ड मोबाईल खरे गेला त्यानंतर त्याने अकाउंट वरून एनईएफटी मार्फत एक लाख दहा हजार रुपये चुकते केल्याचा मोबाईल एडिटेड मेसेज दाखवला आणि उर्वरित पन्नास हजाराचा चेक लिहून मोबाईल घेऊन गेला कालांतराने फिर्यादी याच्या खात्यावर एक लाख दहा हजार रुपये जमा न झाल्याची रक्कम दिसली तसेच त्यांनी दिलेला चेकही बाउन्स झाला ही बाब लक्षात येताच पुरोहित यांनी वाली पोलीस ठाण्यात कलम 420, 406 भादवी गुन्हा दाखल केला असून या घटनेनंतर पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. फसवणुकीच्या आरोपीतील पोलिसांनी मोहम्मद फैजल अब्दुल हसन शेख (28 वर्ष) फणस पाडा वालीव वसई याला बोयदापाडा नाका येथून ताब्यात घेतले होते. आरोपीचे अंगझडती घेतली असता त्याच्या बागेत पोलीस निरीक्षक पोलीस अधिकारी वापरत असलेले तीन खाकी गणवेश,1 पिकॅप,3 गोल बॅरीकॅप मुंबई पोलीस नावे असलेले गोल्ड टोपी, एक हातकडी लाल रंगाचा बेल्ट, एअरगन पोलीस निरीक्षक स्वतःचे नाव पोलीस विभागाचे ओळखपत्र तसेच स्कॅन करून ठेवलेले पोलीस शिपाई पदाचे नियुक्तीपत्र अशा एकूण 30 पेक्षा अधिक पोलिसिस विभागाशी निगडित असलेल्या वस्तू पोलिसांना तपासात आढळल्या. पोलिसांनी पंचनामा करून त्या सर्व वस्तू ताब्यात घेतल्या असून आरोपीने फसवणूक करून घेतलेला मोबाईलही पोलिसांनी हस्तगत केला. याच्यावर अशाच अशाच प्रकारे दोन पोलीस तक्रार दाखल आहे.

पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ 2 वसई, उमेश माने- पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, वालीव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुळे, बाळु कुटे, पोलीस अंमलदार विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी यशस्वीरीत्या कामगीरी करत तोतया पोलिसाला अटक करण्यात यश आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0