Vasai Crime News : माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी ; सराईत चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक
Vasai Successfully arrested burglary Thief : दिवसा घरफोडी करुन चोरी करण्याऱ्या 03 सराईत आरोपी यांना अटक करुन 101.40ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण 7 लाख 52 हजार 368 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत पोलीसांना यश
वसई :- माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी तीन सराईत चोरांना अटक केली आहे.माणिकपुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 7 मार्च आनंद नगर, वसई पश्चिम,येथील बंद घराचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचा सेफ्टी दरवाजा कशाचे तरी साहाय्याने तोडुन त्यावाटे आतमध्ये प्रवेश करुन लोखंडी कपाटातील स्टील पेटीमध्ये असलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण घरफोडी करुन चोरी झालेबाबत तक्रारदार कल्पना नंदकुमार मोरे, (65 वर्षे) त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन माणिकपुर पोलीस ठाणे कलम 454,380,34 भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. Vasai Crime News
पोलिसांकडून आरोपींचा शोध
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळावरील मिळालेल्या माहितीच्या व सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारावर तब्बल 150 ठिकाणचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासुन 03 आरोपीत यांची ओळख पटवून गुप्त बातमीदार यांचे मदतीने आरोपी यांचे नाव निष्पन्न केले. तसेच तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हयातील आरोपीत हे गोरखपुर एक्सप्रेसने जात असल्याची खात्री लायक माहिती प्राप्त झाली. तेव्हा नाशिक रोड मध्य रेल्वे पोलीसांचे मदतीने 72 तासांचे आत आरोपी तीन आरोपींना अटक केली आहे.
आरोपी नावे
1) राकेश कुमार ऊर्फ चक्की रामराज यादव, (33 वर्षे), रा.मालाड पश्चिम, मुंबई,
2) मोहम्मद सईद ऊर्फ शानु गरीबउल्ला खान,( 37 वर्षे), रा.गोरेगांव पश्चिम, मुंबई,
3) लालकेसर ऊर्फ बच्चा ददन राय, (27 वर्षे) रा. वसई पूर्व,
यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली असुन आरोपी यांचेकडुन 4 लाख 67 हजार 568 किंमतीचे 101.41 ग्रॅम सोने, 2 लाख 69 हजार 800 रोख रक्कम व 02 मोबाईल फोन असा एकुण 7 लाख 52 हजार 368 चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आरोपी यांनी सदर गुन्हयात वापरलेली ॲक्टिव्हा मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. Vasai Crime News
पोलीस पथक
कारवाई पौर्णिमा चौगुले श्रिगी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 02, पद्मजा बड़े, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई, राजु माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष चौधरी, पोलीस निरीक्षक प्रशासन गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, पोलीस शिपाई गोविंद लवटे, पो.शि. आनंदा गडदे, प्रविण कांदे, महिला पोलीस शिपाई पुजा कांबळे, अमिषा पाटील व पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ 02 चे पोलीस हवालदार भालचंद्र बागुल, पोलीस शिपाई मोहन खंडवी, यांनी यशस्विरीत्या पार पाडली आहे.