Lok Sabha Election : महाविकास आघाडी मध्ये जागा वाटपावर चर्चा आहे का? संजय राऊत यांचा मोठा दावा, आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित नाही
Maha Vikas Aghadi Not Invite VBA Party For Meeting : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा प्रश्न आहे. आज युती पक्षांची बैठक बोलावण्यात आली असून त्यात वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित करण्यात आलेले नाही.
मुंबई :- लोकसभा निवडणुकीसाठी Lok Sabha Election महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचे Maha Vikas Aghadi चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज आणखी एक बैठक बोलावण्यात आली असून त्यात जागांवर चर्चा होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडीला VBA या बैठकीला निमंत्रित करण्यात आलेले नाही. दरम्यान, उद्धव गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
जागा वाटपावर संजय राऊत काय म्हणाले?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut म्हणतात, “लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे सदस्य आहेत. त्यांनी पहिल्या बैठकीत सहभाग घेतला. आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. महाविकास आघाडी राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यात जागावाट बाबत चर्चा होणार असून त्यानंतर वंचित आघाडी यांचेही मत विचारात घेऊन त्यांच्या बरोबर चर्चा करणार असल्याचे संजय राऊत त्यांनी सांगितले आहे.
आज महाविकास आघाडीची बैठक
आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. ही बैठक दुपारी ४ नंतर सुरू होईल. ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख घटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत. प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. प्रकाश आंबेडकर यांना बोलावले नसल्याचे सध्या माध्यमात माहिती आहे.वास्तविक केसी वेणुगोपाल मुंबईत आले आहेत. त्यामुळेच ही बैठक होत आहे. काँग्रेसला परिस्थिती स्पष्ट करून उमेदवारांची नावे जाहीर करायची आहेत.