नाशिक

Utkarsha Rupwate Resign : महाराष्ट्र काँग्रेसला धक्का ; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव उत्कर्षा रूपवते यांचा काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि इतरत्र पदाचा राजीनामा

•Utkarsha Rupwate Resign उत्कर्षा रूपवते यांचा वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत प्रवेश

नाशिक :- काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दरम्यान, वंचितमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उत्कर्षा रुपवते यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव, राज्य महिला आयोगाच्या सदस्या, प्रदेश काँग्रेस प्रवक्त्या या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तातडीने त्यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी जाहीर होताच रुपवते आक्रमक झाल्या होत्या. Utkarsha Rupwate Resign

शिर्डीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उत्कर्षा रुपवते यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज असल्याची चर्चा होती. मात्र अखेर त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला. दरम्यान, शिर्डीसाठी उत्कर्षा रुपवते या वंचितच्या संपर्कात असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. रुपवतेंनी काही दिवसांपूर्वी मुंबईत आंबेडकरांची भेट घेतली होती. Utkarsha Rupwate Resign

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत प्रवेश

प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत उत्कर्षा यांचा पक्षप्रवेश झाला. अकोल्यात कृषी नगर भागातील आंबेडकरांच्या यवशंत भवन निवासस्थानी त्यांचा प्रवेश झाला आहे. यावेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे हे उपस्थित होते. उत्कर्षा रुपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक होत्या. मात्र, मविआच्या जागावाटपात ही जागा ठाकरे गटाला सुटली. या मतदारसंघात आता ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आता वंचितकडून त्यांना उमेदवारी मिळण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. Utkarsha Rupwate Resign

पक्षश्रेष्ठींकडे केली होती जागेची मागणी गेली अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला डावलत असल्याचा आरोप करण्यात आला होता. उत्कर्षा रूपवते या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षश्रेष्ठींकडे ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी करत होत्या. भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली होती. तसेच शिर्डी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून ठाकरे गटाने दिलेला उमेदवार चुकीचा असून भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबद्दल जनतेत उदासीनता असल्याने त्याचा फेरविचार पक्षाने केला पाहिजे, असे रुपवते यांनी म्हटले होते. Utkarsha Rupwate Resign

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0