पुणे

Lok Sabha Election Update : माझ्या विधानाचा ध चा म करु नका…. अजित पवार

Ajit Pawar Lok Sabha Election : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ईव्हीएम संदर्भातल्या विधानाला राहुल गांधीच्या विधानांचा दिला दाखला

पुणे :- लोकसभा निवडणुकीचे Lok Sabha Election रंगत वाढत असताना नेतेमंडळी आपल्या भाषणातून वेगवेगळ्या प्रकारे जनतेला आवाहन करत असतात. अशातच अजित पवार Ajit Pawar यांनी एक वादग्रस्त विधान करून त्या विधानानंतर अजित पवार यांच्याबरोबर सार्वत्रिक टीका झाली विरोधकांना निवडणुकीत आयता मुद्दा मिळाल्याने त्यांच्या विधानाविरोधात टीका करण्यात आली आहे.राहुल गांधींनी खटाखटा गरीबी हटवू असे विधान केले होते. तसेच मी ग्रामीण भाषेत कचाकचा बटन दाबा असे म्हणालो असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी EVM वरील विधानावर दिले आहे. तसेच उगाच विधानाचा बाऊ करू नये असेही त्यांनी म्हंटले आहे. आज अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यापूर्वी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी दगडूशेठचे दर्शन घेतले. यावेळी अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलत होते.

विधानाचा उगाच कोणीही बाऊ करू नये

यावेळी या विधानाबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, ” ध चा म करु नये. ती जाहीर सभा नव्हती. मी तिथे गंमतीने म्हंटले होते. समोर डॉक्टर, वकील होते. जाहीरनाम्यात बरच काही सांगितले जाते. याचा अर्थ प्रलोभन दाखवले असे म्हणता येणार नाही. मागे ज्याने काम ले, त्यापेक्षा जास्त विकास आम्ही करू हे सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो. हे साध सरळ गणित आहे. मी विचार करुनच बोलतो. मी नेहमी आचारसंहितेमध्ये घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची खबरदारी घेत असतो. राहुल गांधींनी म्हटलेलं की, खटाखटा गरीबी हटवू, मी आपल्या ग्रामीण भाषेत कचाकचा म्हटलं, उगाच कोणी त्यावरुन बाऊ करू नये” असे अजित पवार स्पष्टपणे म्हणाले. Ajit Pawar Lok Sabha Election Update

अजित पवारांचे एक विधान वादाच्या भोवऱ्यात

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील एक सभा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इंदापूरमध्ये काल झालेल्या सभेत अजित पवारांनी एक विधान केले. “आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल, पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कोणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामांसाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ, पण तुम्हीदेखील ईव्हीएमचे बटण पटापट दाबा, म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता राहील”, असा इशाराच त्यांनी मतदारांना दिला. त्यांच्या याच विधानावरून आता त्यांना लक्ष्य केले जात आहे. Ajit Pawar Lok Sabha Election Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0