पुणे

Supriya Sule : सुप्रिया सुळेंनी बारामती मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज, वहिनीशी स्पर्धेवर म्हणाल्या – ‘माझा विश्वास आहे…’

Supriya Sule Fielded MP Form For Baramati Lok Sabha Election : शरद पवार यांच्या कन्या आणि बारामती मतदारसंघातून उमेदवार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. या जागेवरून अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे.

पुणे :- शरद पवार Sharad Pawar Daughter यांच्या कन्या आणि बारामती मतदारसंघातून Baramati Lok Sabha Election उमेदवार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी उमेदवारी अर्ज Fielded Form दाखल केला आहे. या जागेवरून अजित पवार Ajit Pawar यांनी पत्नी सुनेत्रा पवार Sunetra Pawar यांना उमेदवारी दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझे काम, माझी पात्रता पाहून जनता माझ्या पाठीशी नक्कीच उभी राहील, असा विश्वास वाटतो. या विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे. त्यामुळेच मला वाटते की प्रशासन आज तेथे आहे. या दुष्काळाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. Baramati Lok Sabha Election Update

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून मी ‘तुतारी फुंकणारा माणूस’ या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज आज विधान भवन येथे आदरणीय पवार साहेब व त्यांच्यावर नितांत प्रेम करणारी जनता, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साक्षीने दाखल केला. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद, शुभेच्छा, अतूट विश्वास आणि भरघोस पाठबळ यांच्या जोरावर मला पुन्हा या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल हा विश्वास आहे. मायबाप जनतेची सेवा, महिला, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राखण्यासाठी मी लढत आहे. या लढतीत मायबाप जनता माझ्या सोबत राहिल याची मला खात्री आहे. Baramati Lok Sabha Election Update

उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार सचिन अहिर, माजी मंत्री व आमदार विश्वजित कदम, खासदार व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, आमदार अशोक पवार, माजी आमदार जयदेव गायकवाड, युगेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले यांच्यासह महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. Baramati Lok Sabha Election Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0