Thane Crime News : ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे ॲक्शन मोडवर..
Thane CP Ashutosh Dumbare Take Action Against Criminal : बेकायदेशीर हॉटेल्स, पब, डान्सबार वर होणार कारवाई पोलीस आयुक्तांची पोलीस अधिकाऱ्यांना तंबी
ठाणे :- ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांनी आज मंगळवारी (28 मे) रोजी ठाण्याच्या पोलिस आयुक्तालयात घेतलेल्या परिमंडळातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे ॲक्शन मोडमध्ये दिसले आहे. पोलीस अधिकाऱ्यांना Thane Police कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा न करता रात्री बेकायदेशीर चालवणाऱ्या हॉटेल्स पब व डान्सबार Hotels And Pub व तातडीने कारवाई Take A Action करण्याची तंबीच आयुक्तांनी दिले आहे.
पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात झालेल्या अपघातानंतर राज्यातील सर्वच पोलिसांनी आप-आपल्या परिमंडळाच्या हद्दीत बेकायदेशीर रित्या चालणाऱ्या हॉटेल्स पब आणि डान्सबार वर कारवाईचे धाडसत्र चालू केले आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातील कल्याण भिवंडी उल्हासनगर परिमंडळ क्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीमध्ये परिमंडळ हद्दीत उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स, डान्स बार, पब्ज यांच्या वर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहे तसेच कोणतेही अधिकाऱ्यांनी यात कारवाईमध्ये हलगर्जीपणा केला तर संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. Thane Crime News
रात्री उशिरापर्यंत डान्सबारची छम छम
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी परिसर, कल्याण शिळफाटा, नेवाळी, अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात अधिक संख्येने डान्सबार आहेत. काही ठिकाणी पब्ज, बेकायदा हॉटेल्स, ढाबे आहेत. ढाब्यांवर चोरून मद्य विकले जाते. या ढाब्यांना शासनाची परवानगी नाही. डान्सबार बंद असताना ते रात्री उशिरापर्यंत चालविले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याविषयी ठाणे पोलीस आयुक्तालयापर्यंत अनेक तक्रारी गेल्या आहेत असे समजते. Thane Crime News
पोलीस अधिकारी वरिष्ठांचे ‘कलेक्टर काम करतात
पोलीस मुख्यालय, परिमंडळातील काही पोलीस अधिकारी वरिष्ठांचे ‘कलेक्टर’ म्हणून परिसरात काम करतात. ते अधिकारी या बेकायदा उद्योगांची पाठराखण करत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. असे जुने ‘कलेक्टर’ शोधून आयुक्त डुंबरे यांनी या अधिकाऱ्यांना पालिका मुख्यालय किंवा नियंत्रण कक्षात पदस्थापना देण्याची मागणी काही पोलीस अधिकारीच करत आहेत. अशा ‘कलेक्टर’ अधिकाऱ्यांची एक यादीच काही पोलीस अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. हे अधिकारी वर्षानुवर्ष पोलीस आयुक्तालय क्षेत्रात असून त्यांची काही वरिष्ठांशी संबंध असल्याने या विषयावर उघडपणे बोलण्यास कोणीही अधिकारी तयार नाही. Thane Crime News
Web Title : Thane Crime News : Thane Police Commissioner Ashutosh Dumbre on action mode..