Mira Road Crime News : हायवा ट्रकची चोरी केली, पोलिसांच्या जाळ्यात टोळी अडकली!

•पोलिसांनी पाठलाग करून 24 तासाच्या आत गुजरात राज्यातून हायवा ट्रक हस्तगत करण्यात गुन्हे शाखा, कक्ष-1 काशिमीरा यांना यश
मिरा रोड :– मीरा रोड येथून चोरीस गेलेले मालवाहक वाहन हायवा (ट्रक) हस्तगत करण्यात काशिमिरा गुन्हे शाखा कक्ष-1 पोलीस विभागाला यश मिळाले आहे. ही अवजड चोरी करणाऱ्या परराज्यातील तीन जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे.
काका भोईर यांच्या कंपाउंड मधुन घोडबंदर मिरारोड पूर्व येथे फिर्यादी रोहन नबी दगडू पठाण ( वय 62) याचा 38 लाख रुपये किंमतीची हायव ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या अवजड चोरीमुळे खळबळ उडाली होती. फिर्यादी यांनी काशिगाव पोलीस ठाण्यात भा.न्या.स कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी स्थानिक गुन्हे शाखा व काशीगाव पोलिसांचे संयुक्त तपास पथक गठीत केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख व पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत यांच्या पथकाने यांनी तपासाची चक्रे फिरविली. सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने पोलिसांनी कौशल्य पूर्व तपास करून तीन आरोपींना अटक केली आहे. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून केवळ 24 तासात गुजरात राज्यातील वलसाड येथून अटक केली आहे. या तिन्ही आरोपींच्या विरोधात मथुरा उत्तर प्रदेश, अल्वर राजस्थान येथे दरोडा आणि वाहनांची चोरी करण्याचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
अटक आरोपींची नावे
1.शमीम शहाबुद्दीन (वय 31 राज्य राजस्थान.)
2.मकसुद आमीन (वय-३७ रा.जिल्हा मथुरा, राज्य उत्तर प्रदेश,)
3.मोहम्मद आरीफ रशीद (वय 24 रा. राज्य हरियाणा)
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-1, काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, पोलीस हवालदार अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, संतोष लांडगे, मनोज चव्हाण, सचिन हुले, अश्विन पाटील पोलीस अंमलदार प्रशांत विसपुते, गौरव बारी, सौरभ इंगळे, किरण असवले तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सायबर गुन्हे शाखा यांनी केली.