Maharashtra News | ‘टेंडर वॉर’ मधून कारागृह विभागावर बेछूट आरोप ? आयपीएस अमिताभ गुप्ता, डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर ‘निशाणा’

- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप
- आयपीएस डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याकडून आरोपांचे खंडन
पुणे, दि. ६ मार्च, महाराष्ट्र मिरर Maharashtra News
ऐन विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना राज्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आयपीएस अमिताभ गुप्ता IPS Amitabh Gupta, डॉ. जालिंदर सुपेकर IPS Dr.Jalindhar Supekar यांच्यावर ‘निशाणा’ साधत कारागृह विभागात ५०० कोटीं रकमेचा घोटाळा झाल्याचा ‘बॉम्ब’ फोडला आहे. परंतु ‘टेंडर वॉर’ मधून कारागृह विभागावर बेछूट आरोप झाल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. टेंडर प्रक्रिया राबविताना सर्व स्तरावर पारदर्शक भूमिका घेत नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या कारागृह विभागाला ‘टेंडर वॉर’चा त्रास सहन करावा लागत आहे.
आयपीएस डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याकडून आरोपांचे खंडन
यावेळी महाराष्ट्र मिररला बोलताना आयपीएस डॉ. जालिंदर सुपेकर यांनी स्पष्ट केले कि, टेंडर प्रक्रिया राबविताना सर्व नियम अटींचे पालन करण्यात आले आहे. याबाबत काही बाबी न्याय प्रविष्ट आहेत. कारागृह विभागावर लावण्यात आलेल्या आरोपांचे आम्ही खंडन करतो.
आयपीएस अमिताभ गुप्ता यांच्यावर चुकीचे आरोप ?
पुणे शहरात पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना गुन्हेगारांना मोक्क्याचा दणका देणारे धडाकेबाज अधिकारी अमिताभ गुप्ता यांच्यावर देखील बेछूट आरोप लावण्यात आले आहेत. आयपीएस अमिताभ गुप्ता यांची जुलै २०२४ दरम्यान कारागृह विभागातून बदली झाली होती. राजू शेट्टी यांनी आरोप करताना जो कालावधी निदर्शनास आणून दिला आहे तो आणि गुप्ता यांचा कार्यकाळ यांच्यात तफावत निदर्शनास येत आहे. यामुळे नेमक्या कोणत्या कारणाने अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहेत हे अस्पष्टच आहे.
राजकीय वलय निर्माण करण्यासाठी आरोप !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृह खात्याच्या अधिनस्त असलेले कारागृह विभागावर निशाणा साधून माजी खासदार राजू शेट्टी यांनी राजकीय ‘स्टंट’ केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. राजकीय बस्तान बसविण्यासाठी व प्रसिद्धी झोतात येण्यासाठी अधिवेशन काळात राजू शेट्टीकडून मोठा डाव साधण्यात आला आहे.