महाराष्ट्रशैक्षणिक

Vidhan Parishad Election : मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; १ लाख ७७ हजार ३२ मतदार

नवी मुंबई : विधान परिषदेच्या Vidhan Parishad Election मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कोकण विभागाच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त तथा सह निवडणूक अधिकारी अमोल यादव यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची माहिती दिली.या निवडणुकीसाठी बुधवार, २६ जून रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार शुक्रवार, ३१ मे रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे.

त्यानुसार या निवडणुकीसाठी ७ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी १० जून रोजी सकाळी ११ वाजेपासून केली जाईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १२ जून दुपारी ३ वाजेपर्यंत असेल, अशी माहिती अमोल यादव यांनी दिली.२६ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होईल. तर १ जुलै रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात होईल. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शुक्रवार, ५ जुलै रोजी पूर्ण होईल, असे यादव यांनी स्पष्ट केले आहे.

१ लाख ७७ हजार ३२ मतदार

मुंबई पदवीधर मतदारसंघात स्त्री ३७ हजार ६१९ तर पुरुष ५३ हजार ६४१ असे एकूण ९१ हजार २६३ मतदार आहेत. तर मुंबई शिक्षक स्त्री १० हजार ८४९, तर पुरुष ३ हजार ६६६ असे एकूण १४ हजार ५१५ मतदार आहेत. त्याचप्रमाणे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात स्त्री ७४ हजार ५७५, तर पुरुष १ लाख २ हजार ४४२ असे एकूण १ लाख ७७ हजार ३२ मतदार आहेत. यात २८ मे रोजी नोंदणी होणाऱ्या पदवीधर मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title : Mumbai Graduates, Konkan Department Graduates and Mumbai Teachers Constituency Election Program Announced; 1 lakh 77 thousand 32 voters

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0