Thane Police Bribe News : लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांची कारवाई , पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदार यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
Anti Corruption Bureau Arrested Thane Kalwa Police Constable : कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार माधव अर्जुन दराडे व पोलीस उपनिरीक्षक तुषार तानाजी पोतेकर यांना सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी ताब्यात घेतले
ठाणे :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे, Anti Corruption Bureau Thane Department यांनी कारवाई करत पोलीस अधिकारी आणि शिपाई यांना अटक केली आहे. खाकीतून लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने दोन पोलिसांना अटक केली आहे. यामध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक पोलीस हवालदार यांचा समावेश आहे. दोन लाखाचे लाच मागून तडजोड करून एक लाख 90 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी रंगेहाथ अटक करण्यात आले आहे. Thane Bribe News
यातील तक्रारदार यांचा ॲल्युमिनीय पट्टी बनवण्याचा कारखाना वाडीवरे, नाशिक येथे आहे. त्यांनी त्यांचे कंपनीतील ॲल्युमिनीय पटटया हा माल मुंबई येथे विक्री आयशर टेम्पो 16 एप्रिल रोजी कळवा पोलीस ठाणे, Kalwa Police News येथील अधिकारी यांनी मालासह पकडून ठेवल्याने तक्रारदार हे त्यांचा माल सोडवण्यासाठी कळवा पोलीस ठाणे येथे गेले असता तेथील पोहवा दराडे यांनी तक्रारदार यांना त्यांचा माल आणि आयशर टेम्पो सोडवण्यासाठी स्वतः करीता तसेच तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पोतेकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उतेकर यांना देण्या करीता एकूण दोन लाख रुपयांची मांगणी करुन, पैसे दिले नाही तर माल आणि गाडी पोलीस ठाणे येथे सडत राहील अशी धमकी दिली Kalwa Police Asking Bribe आणि 24 एप्रिल पर्यंत दोन लाख रुपये घेवून येण्यास तक्रारदार यांना सांगीतल्याने तक्रारदार यांनी 24 एप्रिल 2024 रोजी ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे येथे तक्रार दिली. Thane Bribe News
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी पडताळणी केली असता लोकसेवक १) माधव अर्जुन दराडे पोलीस हवालदार कळवा पोलीस स्टेशन (49 वर्षे) यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे आणि लोकसेवक 2) पोलीस उपनिरीक्षक तुषार तानाजी पोतेकर (40 वर्षे), नेम. कळवा पोलीस स्टेशन, यांनी त्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्यावरून लाप्रवि ठाणे यांनी सापळ्याचे आयोजन करून आलोस माधव दराडे यांना तक्रारदार यांच्याकडुन कळवा पोलीस ठाणे समोरील रस्त्याच्या बाजूला मोकळया जागेत 1 लाख 90 हजार रू. लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नमुद दोन्ही लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेबाबत राजेश जागडे पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी माहिती दिली आहे. Thane Bribe News