मुंबई

Sharad Pawar Group Manifesto : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने जाहीरनामा प्रसिद्ध केला, महिलांबाबत केली ही मोठी घोषणा

Sharad Pawar Group Manifesto शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात महिलांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा Sharad Pawar Group Manifesto प्रसिद्ध केला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी काम करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे. यासोबतच एलपीजी सिलेंडरची किंमत कमी करण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP)- शरदचंद्र पवार (SCP) यांनी आपल्या जाहीरनाम्याला “शपथनामा” असे नाव दिले आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

राष्ट्रवादी-एससीपीचे नेते जयंत पाटील म्हणाले, “आम्ही आज आमचा जाहीरनामा Sharad Pawar Group Manifesto प्रसिद्ध करत आहोत, जाहीरनाम्यात ज्या मुद्द्यांचा समावेश आहे, आमचे नेते हे मुद्दे संसदेत मांडणार आहेत. आमचा जाहीरनामा म्हणजे ‘शपथपत्र’ आहे. महागाई वाढत आहे, शेतकरी चिंताग्रस्त आहेत.” आणि बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे.”पुढे जयंत पाटील म्हणाले, “गेल्या दहा वर्षात एजन्सींचा गैरवापर, खाजगीकरण यांसारख्या समस्या वाढत आहेत. या सर्व मुद्द्यांवर आम्ही आमची भूमिका आधीच मांडली आहे. आम्ही एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करू. जर आम्ही सत्तेत आल्यावर महिला आरक्षणावरही काम करू.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्यातील आश्वासने

 • स्वयंपाक घरातील गॅसच्या किमती आम्ही कमी करत त्या 500 रुपयांपर्यंत निश्चित करू. त्यासाठी अवशक्यता लागल्यास केंद्र Sharad Pawar Group Manifesto सरकारकडून त्याला सबसीडी देईल. यूपीए सरकारच्या काळात जशा गॅसच्या किमती होत्या. त्याचप्रमाणे आता किमती ठेवल्या जातील.

आमचं सरकार आल्यावर देशातील स्पर्धा परीक्षांसाठी आकारले जाणारे शुल्क माफ केले जाईल.

 • महिला आणि मुलींसाठी स्त्री शिक्षणात असलेले अडथळे आम्ही दूर करू.
 • समाज शाळा आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करू.
 • शाळा कॉलेजमध्ये सेफ्टी ऑडिट करू.
 • शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत दर. त्यासाठी शेतकरी आयोग निर्माण करू
 • सत्तेत आल्यावर जातीनिहाय जनगणना करू.
 • आरक्षणाची 50 टक्क्यांची अट दूर करण्यासाठी विशेष कायदा करू.
 • खाजगी कॉलेजमध्ये आरक्षण ठेवण्याचं काम करू.
 • जेष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना करू.
 • आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 4 टक्क्यांपर्यंत करू.
 • शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 6 टक्क्यांपर्यंत करू.
 • शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी असणार.
 • खाजगीकरण आम्ही मर्यादा आणू.
 • अग्निवीर योजना आम्ही बंद करू.
 • वन नेशन आणि वन इलेक्शन चर्चा करणे आता योग्य नाही, आधी आहेत त्या इलेक्शन यंत्रणा सक्षम करू.

आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 4 टक्क्यांपर्यंत करू.

 • शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 6 टक्क्यांपर्यंत करू.
 • शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी असणार.
 • खाजगीकरण आम्ही मर्यादा आणू.
 • अग्निवीर योजना आम्ही बंद करू.
 • वन नेशन आणि वन इलेक्शन चर्चा करणे आता योग्य नाही, आधी आहेत त्या इलेक्शन यंत्रणा सक्षम करू.
 • प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख देऊ.
 • अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू.
 • पेट्रोल आणि डिजेलवरील कराची पुनर्रचना करू. देशातील महागाई वाढण्यासाठी पहिले कारण म्हणजे पेट्रोल-डिझेलचे दर आहे. हे दर आम्ही मर्यादीत ठेवू.
 • केंद्रात 30 लाखांहून अधिक शासकिय नोकऱ्या रिक्त आहेत. त्या रिक्त जागा आम्ही सरकारमध्या सामील झाल्यास भरू आणि देशातील जनतेला चांगली सेवा देण्याचा आग्रह करू.
 • शासकीय नोकरीत महिलांना 50 टक्के आरक्षण ठेवण्याचा आग्रह करू.
 • देशात जीएसटी कर नागरिकांना लुबाडण्याचे काम करत आहे. जीएसटी कराबाबत केंद्र सरकारचा हस्तक्षेप कमी ठेवत, संबंधित राज्यांना जीएसटी कर ठेवण्याचे अधिकार देऊ.
 • देशातील अप्रेंटिस कायदा मंजूर करताना एखादा विद्यार्थ्याने डिग्री आणि डिप्लोमामध्ये पदवी मिळवल्यास त्याला पहिल्या एक वर्षासाठी स्टायपेंड दिले जाईल. 8500 रुपये स्टायपेंड दिला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0