Mumbai News : ‘पोलीस दलासाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ ते वडार समाजाला रॉयल्टीत सवलत; शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे 7 मोठे ऐतिहासिक निर्णय’
Mumbai News :मुंबई :- कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी राज्यातील शाळा आणि वसतिगृहांच्या बिकट अवस्थेविरुद्ध पुकारलेल्या आक्रमक आंदोलनाची राज्य सरकारने अखेर अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. सह्याद्री अतिथीगृहावरील विशेष बैठकीनंतर आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि इतर मागास बहुजन कल्याण (OBC) विभागाच्या वसतिगृहांबाबत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या 2,388 अनुदानित वसतिगृमांतील कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ करण्यासोबतच 7 अत्यंत महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांवर मंजुरीची मोहर उमटवण्यात आली. https://maharashtramirror.com/ Mumbai News
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 7 महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय
1.पोलीस दलासाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ योजना:
कर्तव्य बजावताना जीवाची पर्वा न करता साहसी कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जानेवारी 2026 पासूनची कामगिरी यासाठी गृहीत धरली जाणार असून, दरवर्षी 1 मे (महाराष्ट्र दिन) च्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा होईल. या पदकासोबत 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिले जाईल. (गृह विभाग)
2.वडार समाजाला मोठा दिलासा; रॉयल्टीत सवलत:
पारंपरिक दगडफोडी व उत्खनन करणाऱ्या वडार समाजासाठी गौण खनिज स्वामित्वधनाची (रॉयल्टी) वार्षिक उत्खनन मर्यादा 200 ब्रास वरून थेट 500 ब्रास करण्यात आली आहे. यासाठी ‘महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1968’ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. (महसूल विभाग)
3.उच्च व तंत्रशिक्षणात ‘सी.एम. सृष्टी’ (CM SRISTHI) योजना:
राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात संशोधन व नवसंशोधनाला चालना देण्यासाठी ‘सी.एम. सृष्टी’ (Scheme for Research, Innovations and Technological Hubs in Higher Education Institutions) ही नवी योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे, आयसीटी मुंबई, सीओईपी पुणे आणि बाटू लोणेरे या संस्थांद्वारे ही योजना राबवली जाईल. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
4.पोलीस कोठडीतील अनैसर्गिक मृत्यू प्रकरणी नुकसानभरपाई धोरण:
पोलीस कोठडीत (Custodial Death) अनैसर्गिक मृत्यू झाल्यास मृताच्या कायदेशीर वारसांना वेळेत आणि पारदर्शकपणे आर्थिक सहाय्य देण्यासाठी सर्वसमावेशक नुकसानभरपाई धोरणास मंजुरी देण्यात आली. (गृह विभाग)
5.2 हजार 388 अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ:
अभिजीत दिपके यांच्या आंदोलनानंतर सरकारने स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या 2,388 अनुदानित वसतिगृहांतील अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि चौकीदारांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (सामाजिक न्याय विभाग)
6.’डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार’ योजनेच्या भत्त्यात भरघोस वाढ:
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी, बारावी आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास व शैक्षणिक सुविधांसाठी मिळणाऱ्या ‘स्वाधार’ योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. (सामाजिक न्याय विभाग)
7.’पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम’ योजनेत सुधारणा:
अनुसूचित जमातीतील (ST) विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजने’तील भोजन व निवास भत्त्यांच्या रक्कमेत वाढ करून सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. (आदिवासी विकास विभाग)


