छ.संभाजी नगरछत्रपती संभाजी नगर

Sambhaji Nager News : दिल्ली आंदोलनाचा लढा सुरु असतानाच CJP प्रमुख अभिजित दिपकेंवर दुःखाचा डोंगर; 85 वर्षांच्या आजीचे हिंगोलीत निधन!’

Sambhaji Nager News : दिल्ली पोलिसांच्या कैदेत असलेल्या दिपकेंना मूळ गावी परतण्याची परवानगी मिळणार का?; पालकांचा केंद्र सरकार अन् पोलिसांवर तीव्र संताप

Sambhaji Nager News : छत्रपती संभाजीनगर :- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत ‘महाआंदोलन’ छेडण्याच्या निर्णायक टप्प्यावर असतानाच कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिजित दिपके यांच्या 85 वर्षांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचे हिंगोली जिल्ह्यातील संतूक पिंपरी या मूळ गावी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे अभिजित दिपके यांच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी हिंगोलीकडे रवाना व्हावे लागले आहे.https://maharashtramirror.com/ sambhajinager News

विमानातून अटकेनंतर पोलिसांच्या कैदेत; अभिजित दिपकेंच्या महाराष्ट्रात परतण्यावर प्रश्नचिन्ह

शनिवारी सकाळी दिल्लीत दाखल होताच दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके यांना धावपट्टीवरच विमानातून ताब्यात घेतले आणि अज्ञातस्थळी हलवले. एकीकडे आंदोलन ऐन भरात असताना आणि दुसरीकडे स्वतः अभिजित पोलिसांच्या कैदेत असतानाच आजीच्या निधनाची ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, आजीच्या अंत्यसंस्कारासाठी अभिजित दिपके यांना महाराष्ट्रात परत येण्याची कायदेशीर परवानगी दिल्ली पोलीस देतात की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

‘संसदेत डाकू बसलेत अन् विद्यार्थ्यांवर दडपशाही!’; आई-वडिलांचा सरकारवर घणाघात

मुलाला विमानातून बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्यानंतर अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारवर तीव्र आगपाखड केली.

वडील भगवान दिपके संतापाने म्हणाले: “एवढा मोठा पोलीस फौजफाटा दिल्लीत का तैनात केलाय? विद्यार्थ्यांनी काय चंबळच्या खोऱ्यातील डाकू जमा केलेत का? डाकू तर सगळे संसदेत बसले आहेत! एका साध्या आंदोलनासाठी एवढी पोलीस ताकद वापरण्याची गरजच काय?”

आईने केला सवाल: “माझ्या मुलाने असे काय वाईट केले होते की थेट विमानात घुसून त्याला ताब्यात घ्यावे लागले? बलात्कारी आणि गुन्हेगारांना अटक करायला पोलीस अशी तत्परता दाखवत नाहीत. मग एका 30 वर्षांच्या मुलाला प्लेनमधून उचलण्याचे कारण काय?”

दरम्यान, आजीच्या निधनामुळे सीजेपीचे कार्यकर्ते आणि दिपके कुटुंबीयांवर शोकाकुल वातावरण पसरले असून, दिल्लीतील आंदोलनाला एक नवे आणि नाट्यमय वळण मिळाले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button