मुंबई
Trending

IAS Transfer News : राज्यातील प्रशासकीय फेरबदल! विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवीन आयुक्त; तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Transfer News : श्रावण हर्डीकर यांच्या जागी पूर्णवेळ आयुक्तांची नियुक्ती; पुणे महानगर परिवहन महामंडळालाही मिळाले नवीन व्यवस्थापकीय संचालक

मुंबई :- राज्य प्रशासनातील तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बुधवारी रात्री उशिरा बदल्या करण्यात आल्या आहेत. या फेरबदलात पिंपरी-चिंचवड महापालिकेला अखेर कायमस्वरूपी आयुक्त मिळाले असून, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. PCMC Latest News

विजय सूर्यवंशी आता

पिंपरी-चिंचवडचे कारभारी
डॉ. विजय सूर्यवंशी हे 2006 च्या बॅचचे अनुभवी आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते मुंबईत कोकण विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अतिरिक्त कार्यभार आतापर्यंत श्रावण हर्डीकर यांच्याकडे ‘प्रभारी आयुक्त’ म्हणून होता. मात्र, आता सूर्यवंशी यांची पूर्णवेळ आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याने शहराच्या प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची शक्यता आहे. सूर्यवंशी लवकरच आपल्या पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.

पुणे आणि मुंबईतील इतर महत्त्वाच्या नियुक्त्या

सूर्यवंशी यांच्यासोबतच 2015 च्या बॅचमधील दोन अधिकाऱ्यांनाही नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत:

महेश आव्हाड (IAS 2015): महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले महेश आव्हाड यांची नियुक्ती आता पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) येथे ‘अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक’ (CMD) म्हणून करण्यात आली आहे. पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नेतृत्व आता त्यांच्याकडे असेल.

बापू पवार (IAS 2015): राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सहसचिव म्हणून कार्यरत असलेले बापू पवार यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण (मुंबई) येथे करण्यात आली आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button