देश-विदेश

TCS Employee Data Leak:टीसीएसच्या काही कर्मचाऱ्यांची माहिती उघड झाल्याचा संशय

ग्राहकांची माहिती आणि यंत्रणांवर कोणताही परिणाम नसल्याचे कंपनीचे स्पष्टीकरण : TCS Employee Data Leak

TCS Employee Data Leak:टीसीएसच्या काही कर्मचाऱ्यांची माहिती उघड झाल्याचा संशय

ग्राहकांची माहिती आणि यंत्रणांवर कोणताही परिणाम नसल्याचे कंपनीचे स्पष्टीकरण : TCS Employee Data Leak


बेंगळुरू, वृत्तसंस्था :
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) काही कर्मचाऱ्यांशी संबंधित माहिती संभाव्यरीत्या उघड झाल्याचे सूचित करणारे इशारे मिळाले आहेत. मात्र, ग्राहकांची माहिती किंवा त्यांच्या यंत्रणांवर परिणाम झाल्याचे कोणतेही संकेत नसल्याचे देशातील सर्वांत मोठ्या माहिती-तंत्रज्ञान सेवा कंपनीने सोमवारी स्पष्ट केले. TCS Employee Data Leak, maharashtra mirror

TCS Employee Data Leak:टीसीएसच्या काही कर्मचाऱ्यांची माहिती उघड झाल्याचा संशय


इशाऱ्यांमध्ये उल्लेख करण्यात आलेली माहिती चार वर्षांहून अधिक जुनी असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. ही माहिती कर्मचाऱ्यांच्या मूलभूत तपशीलांपुरती मर्यादित असल्याचे टीसीएसने निवेदनात म्हटले आहे. मात्र, हे इशारे कोणी आणि केव्हा दिले, तसेच नेमकी कोणती माहिती उघड झाली असण्याची शक्यता आहे, याबाबत कंपनीने अधिक तपशील जाहीर केलेला नाही.TCS Employee Data Leak, maharashtra mirror google


कथित हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या पद्धतीपासून संरक्षण करण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळापासून आवश्यक सुरक्षा उपाय लागू असल्याचे टीसीएसने सांगितले. कंपनीच्या स्वतःच्या परिचालन यंत्रणांवरही या घटनेचा कोणताही परिणाम झालेला नाही.
“सध्याच्या आढाव्यानुसार आमची सुरक्षा नियंत्रणे प्रभावी आहेत. कंपनी संबंधित डिजिटल वातावरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे,” असे टीसीएसने निवेदनात स्पष्ट केले.


ही माहिती उघड झाल्याचा केवळ संशय असून प्रत्यक्ष डेटा गळतीची कंपनीने अद्याप पुष्टी केलेली नाही. तसेच ग्राहकांची माहिती आणि यंत्रणा सुरक्षित असल्याचेही टीसीएसने नमूद केले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button