Thane News: व्यासपीठावरील समईने घेतला पेट; सरनाईकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली
Thane News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना व्यासपीठावरील समईने अचानक घेतला पेट

Thane News ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना व्यासपीठावरील समईने अचानक मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. समईचा भडका उडताच मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसंगावधान राखत जवळील फुलांचा वापर करून आग विझवली. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.https://maharashtramirror.com/ Thane News
ठाण्यात परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू झाले.https://maharashtramirror.com/ Thane News
दरम्यान, शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठावरील समईने अचानक पेट घेतला. काही क्षणांत आगीने मोठा भडका घेतल्याने उपस्थितांमध्ये धांदल उडाली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने पुढे होत जवळच असलेली फुले आगीवर टाकली आणि समई विझवली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.



