महाराष्ट्र

Mumbai News : रिपाईचा खरात गट महायुतीच्या वाटेवर? फडणवीसांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

Mumbai News : मुंबई : राज्याच्या राजकारणात महायुतीच्या विस्ताराबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट)चे नेते सचिन खरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने खरात गट महायुतीत सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन खरात हे वर्षा बंगल्यावर फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून, खरात गटाकडून महायुतीला पुन्हा पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वीही खरात गटाने महायुतीला पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
रिपाई (खरात गट)चा सध्या राज्यात एकही खासदार किंवा आमदार नसला, तरी सचिन खरात हे आंबेडकरी विचारांचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे खरात गट महायुतीसोबत आल्यास दलित आणि बहुजन मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महायुतीला त्याचा राजकीय फायदा होऊ शकतो, अशी चर्चा आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विविध मित्रपक्षांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत रिपाईच्या आणखी एका गटाला सोबत घेण्याची राजकीय रणनीती महत्त्वाची ठरू शकते. विशेषतः आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दलित-बहुजन मतांचे समीकरण महायुतीसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News
दरम्यान, खरात गट महायुतीत औपचारिकपणे सहभागी होणार का, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सचिन खरात आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाल्याने महायुतीच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button