महाराष्ट्र

Tourism News : रिफ्रेशमेंटसाठी एकदिवसीय सहलीचा ट्रेंड

वीकेंडला पर्यटनस्थळे होताहेत फुल्लं

पुणे, स्मिता कुलकर्णी : रोजच्या दैनंदिन कामाचा अनेकदा कंटाळा येतो. त्यामुळे आठवडाभर काम केल्यानंतर वीकेंडला कुठेतरी मस्त एकदिवसीय सहल करून पुन्हा रिफ्रेश होण्याचा ट्रेंड कोरोनानंतर चांगलाच वाढला आहे. वीकेंडला पर्यटनस्थळे गजबजून जात आहेत. त्याला देवस्थानही अपवाद राहिली नाहीत. त्यामुळेच सध्या रिफ्रेश होण्यासाठी ‘एकदिवसीय सहल’ ही कनस्पेट आता चांगलीच रूजली आहे.Tourism News

सहल म्हणजे आनंद, उत्साह, गप्पागोष्टी आणि रिफ्रेशमेंट असेच गणित असते. रोजच्या व्यस्त जीवनामधून एक दिवस तरी एक वेगळा दिवस घालवायला सर्वांनाच आवडते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत थोडा आनंद मिळवण्यासाठी प्रत्येक जण पर्याय शोधाताना दिसत आहे. त्यामध्ये एकदिवसीय सहलीला मोठी पसंती मिळत आहे. अनेकजण आपल्या कुटुंबाबरोबर या सहलीचा आनंद घेतात. तर, कधी वाहन चालवायला नको आणि वाहतूक कोंडीचा मानसिक त्रासही नको म्हणून टूर कंपनीला प्राधान्य देताना दिसून येतात.Tourism News

एकाच पट्ट्यातील अनेक पर्यटन स्थळांना भेटी देत पर्यटकांना पर्यटनाचा निखळ आनंद मिळवून देण्यासाठी टूर कंपन्याही विविध सहली आयोजित करतात. तसेच, त्यामध्ये नाश्ता, जेवण अशा विविध सवलतीही देत असल्याने पर्यटकांना त्याची भुरळ पडत आहे. त्यामुळेही अशा एकदिवसी सहलींना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे या टूर कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे.

पुण्याजवळील खडकवासला, पाणशेत धरण, नीलकंठेश्वर, सिंहगड, राजगड, जेजुरी, मोरगाव, थेउर आदी ठिकाणांबरोबरच पुण्याबाहेरील सातारा, वाई, दिवेआगर-श्रीवर्धन, हरिहरेश्र्वर, हडशी, शिवथरघळ, भीमाशंकर, माळशेज घाट, नाणेघाट, ताम्हिणी घाट, खंडी धबधबा, अशा विविध ठिकाणांना पर्यटकांची पसंती मिळत आहे.Tourism News

सध्या झालेल्या पावसामुळे ताम्हिणी घाट, माळशेज घाट या सहली रद्द केल्या आहेत. खंडी, मढे घाट, बनेश्र्वर , देवकुंड धबधबा या ठिकाणांना नागरिकांची पसंती मिळत आहेत. लोकांना चुलीवरचे जेवण, शुद्ध हवा आणि धबधब्याखाली भिजायाला आवडते. जुलै महिन्यातील शनिवार आणि रविवारी हजारांहून अधिक पर्यटकांनी या सहलीचा लाभ घेतला.

नुपूर देशपांडे, संचालिका, एन.डी.बी.टी.टी. टूर्स कंपनी

 एकदिवस जरा वेगळा गेला, गावाकडील जेवणाचा अस्वाद घेतला. सहलीमध्ये अनेक लोक भेटले, गप्पा झाल्या. निसर्गरम्य वातावरणात मन ताजेतवाने झाले. सहलीतील सर्व नागरिकांनी खूप धमाल केली.

सुरेश भालकीकर, पर्यटक

Tourism News

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button