मुख्य मजकुराकडे जा

Mumbai News : नेपाळ महापूरातीला लोकांना अभिनेता सोनू सूदची मदत

Mumbai News : मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या महापुराने मोठा विंध्वस झाला आहे.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

नेपाळ महापूरातीला लोकांना अभिनेता सोनू सूदची मदत
नेपाळ महापूरातीला लोकांना अभिनेता सोनू सूदची मदत

Mumbai News : मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या महापुराने मोठा विंध्वस झाला आहे. या विनाशकारी पुरामुळे आतापर्यंत सुमारे १६० जणांचा मृत्यू झाला असून ७५० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. नेपाळमधील लोकांना अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. नेपाळ लष्करातर्फे युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे. १५ हेलिकॉप्टर्सच्या मदतीने आत्तापर्यंत २५० हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नेपाळकडून सर्वेत्तोपरी प्रयत्न केले जात आहेत. या कठीण काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने नेपाळच्या लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
अभिनेता सोनू सुदने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करून पूरग्रस्तांना प्रोत्साहन दिले आहे. “नेपाळ, या कठीण काळात तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही अन्न, निवारा आणि तुम्हाला पुन्हा उभारणीसाठी मदत करण्याच्या आशेसह लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत.” असे पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला हिनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, या पोस्टमध्ये तिने लोकांना या पूरस्थितीत नेपाळसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper