महाराष्ट्र

Sanjay Raut : तुम्ही महिलांबद्दल जो शब्द वापरला, तो शब्द…नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार

•भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली,नवनीत राणा आक्रमक

अमरावती :- लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली होती. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. तुम्ही महिलांबद्दल जो शब्द वापरला, तो शब्द तुमच्यापेक्षा जास्त महिलांना समजतो. तुम्ही तुमच्या पत्नीला, आईला आणि मुलीला विचारा की, तुम्ही कोणता शब्द वापरला आहे. अशा कडक शब्दात नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

संजय राऊत यांनी त्यांच्या बायकोला विचारावे की, तुम्ही काय शब्द बोलला आहात. तुमच्या मुलीचे लग्न झाले, त्यावेळी तीला सासरी पाठवले असेल, तेव्हा त्या मुलीला विचारा तुम्ही कोणता शब्द वापरला आहे. ज्या आईने तुम्हाला जन्म दिला, त्या आईला देखील विचारा की तुम्ही काय शब्द वापरला आहे. अशा शब्दात नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.
या पद्धतीने तुम्ही जर एखाद्या बाई बद्दल घाणेरडे शब्द वापरत असाल. या घाणेरड्या पातळीवर तुम्ही जात असाल तर, तुमची काय लायकी आहे, हे दिसते. यातून तुमची संस्कृती आणि तुमच्यावरील संस्कार सर्व लोकांनी पाहिले असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटांमध्ये जे काही मोजके लोक राहिले आहेत. त्या सर्व उरलेल्या लोकांमध्ये सर्वात बोगस व्यक्ती जर कोणी असेल तर ते संजय राऊत असल्याचे देखील नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

मला कोणी मराठी भाषा शिकवू नये – संजय राऊत

मी संसदीय शब्दांचा वापर करतो. मी पत्रकार आहे, संपादक आहे. मला कोणीही मराठी भाषा शिकवू नये, अशा शब्दात संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. मी कायम संसदीय शब्दांचाच वापर करतो. मला मराठी भाषा शिकवू नये, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. मी 40 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलेला माणूस असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0