Maharashtra Lok Sabha Election News : महायुती त जागावाटपसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांनीच बलिदान द्यायचे का?

Babanrao Madane React On Mahayuti Lok Sabha Seat : जागा वाटपाबाबत अजित पवार गटावर अन्याय?
मुंबई :- राज्याच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election रिंगणात महाराष्ट्रात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान काल (19 एप्रिल) संपन्न झाले असून महाराष्ट्रातील पाच जागा करिता काल जवळपास 90 हुन अधिक उमेदवार रिंगणात उभे होते यामध्ये सरासरी 55% मतदान काल झाले आहे. हे सर्व होत असताना महाराष्ट्रातील इतरत्र जागेबाबत अद्यापही अजित पवार गटाला Ajit Pawar Group स्पष्टता नाही केवळ चार ते पाच जागांवर अजित पवार गटाला आतापर्यंत स्पष्टता आली आहे भाविकास आघाडी विरुद्ध महायुती सामन्यात महायुतीकडून अजित पवार गटावर अन्याय होतोय का असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने, केंद्रीय निवडणूक Election Commission आयोगाने खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार यांची असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाच्या नेतृत्व स्वीकारून हि महाराष्ट्रात अजित पवार गटावर मोठ्या अन्याय झाल्याचा सूर कार्यकर्त्यांकडून येत आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी नेते मुंबई प्रदेशाध्यक्ष बबनराव मदने यांनी पक्षाकडून स्पष्ट भूमिका केलेले आहे. Maharashtra Lok Sabha Election News 2024
बबनराव मदने Babanrao Madne म्हणाले की, महायुती धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पारंपारिक जागा असलेल्या सातारा नाशिक परभणी या तिन्ही जागा आम्ही सोडले आहे. तसेच शिरूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही शिरूर लोकसभा Shirur Lok Sabha क्षेत्रातून आम्हाला जागा मिळाली असले तरी आम्हाला आयात उमेदवारावर ती जबाबदारी द्यावी लागली परंतु या सर्व घडामोडींवर आमचे पक्षश्रेष्ठ यांनी घेतलेल्या निर्णय याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही परंतु एक अजितदादा यांचा सच्चा कार्यकर्ता असल्याच्या हेतूने आमच्यावर हा थोड्या प्रमाणात का होईना अन्याय झाल्याचा दिसून येत आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत महायुती धर्म सोडणार नाही तसेच एकत्रित राहून जेवढ्या जागा आमच्या पदरात मिळाले आहे त्या आम्ही शंभर टक्के विजयी होणारच आणि त्याबरोबर महायुतीच्या इतरत्र पक्षातील उमेदवारांनाही आम्ही जिंकून आणण्याकरिता सदैव प्रयत्नशील राहील. उरलेला मुंबईच्या जागेवर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळेल अशी भावना व्यक्त करतो. पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य निर्णय घेईल. Maharashtra Lok Sabha Election News 2024