पुणे

Baramati Lok Sabha Election : कन्हेरीच्या मारुती मंदिरात नाराळ फोडत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात

Sunetra Pawar On Baramati Lok Sabha Election : नव्या राजकीय पर्वाची सुरुवात असताना अजित पवार माझ्या पाठीशी उभे ; सुनेत्रा पवार

पुणे :- बारामती लोकसभा Baramati Lok Sabha Election मतदार संघाची सून म्हणून एकच सांगते. आपल्या आवडत्या चिन्हाला मतदान करुन बारामतीची सून म्हणून मला विजयी करावे असे आवाहन बारामतीतून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार Sunetra Pawar यांनी केले आहे. कन्हेरीच्या मारुती मंदिरात नाराळ फोडत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी झालेल्या कन्हेरीचा मारुती कायम पाठीशी तसेच कन्हेरीचा मारुती कायम माझ्या पाठीशी राहिलाय आणि पुढेही राहणार, असा विश्वास सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “नव्या राजकीय पर्वाची सुरुवात असताना अजित पवार माझ्या पाठीशी उभे आहेत. त्यांच्या माझ्यावर विश्वास आहेच मात्र जास्त विश्वास तुमच्यावर आहे. तुमच्या सगळ्यांच्या वहिनींना काम करताना जबबादारीची जाणीव आहे. मी सर्व अपेक्षा पूर्ण करेल”, असा विश्वास त्यांनी बारामतीकरांनी दिला. Maharashtra Lok Sabha Election Update

आपला विजय निश्चित;सुनेत्रा पवार

तसेच पुढे त्या म्हणाल्या, “तुम्ही सगळेच अजित पवारांच्या पाठीशी आहात आणि राहणार आहात मात्र त्यांच्यामुळे मलाही पाठिंबा देणार याची खात्री आहे. आपले सहकारी विजय शिवतारे आणि बाकी सहकाऱ्यांच्या सोबत येण्याने वज्रमुठ पक्की झाली आहे. हे सगळे सहकारी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे”, असे म्हणत सुनेत्रा पवार यांनी विजयाची खात्री दिली. Maharashtra Lok Sabha Election Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0