Mumbai News: आमदार रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार?
Mumbai News: मुंबई, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे.
1 मिनिट वाचन

राहुल गांधीशी वाढत्या जवळकीतेमुळे चर्चेला उधाण
Mumbai News: मुंबई, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. गेल्या काही दिवसांत त्यांची काँग्रेस नेत्यांसोबत वाढलेली जवळीक, राहुल गांधी यांच्याशी झालेल्या भेटी आणि त्यांच्या आंदोलनासाठी राहुल गांधींना दिलेले निमंत्रण यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.रोहित पवार यांच्या वारंवार राहुल गांधींच्या समर्थनातील वक्तव्यांमुळे रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनीही केला होता. दरम्यान, याबाबत आम्ही रोहित पवारांना विचारल्यानंतर त्यांनी मात्र या चर्चांचं खंडन केले. राज्यात विरोधी पक्षनेता नाही म्हणून देशातल्या विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून राहावे लागते, असे उत्तर रोहित पवारांनी दिले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
आपल्या महाराष्ट्रात विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता नाही. मग महाराष्ट्रात महत्त्वाचं संवैधानिक पद नसेल तर आपण कोणावर अवलंबून राहणार? तर देशाच्या विरोधी पक्षनेत्यावर. ते कोण आहेत, तर राहुल गांधीजी आहेत. आदिवासी समाजाचा मुद्दा हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून मध्य प्रदेश आणि इतर भागातही हा समाज आहे. त्यांच्यावर भाजप सातत्याने अन्याय करत आला आहे. त्यामुळे हा विषय फक्त महाराष्ट्रापुरता नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरचा आहे. त्या अनुषंगाने आम्ही राहुल गांधी यांना विनंती केली होती, असे रोहित पवार यांनी म्हटले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनाला उपस्थिती लावली होती. तसेच, अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली होती. आता आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून त्यांनी राहुल गांधींना आंदोलनासाठी बोलावल्याने दोन्ही नेत्यांमधील राजकीय जवळीक पुन्हा चर्चेत आली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




