मुंबई

Rahul Gandhi In Maharashtra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा महाराष्ट्रात

Bharat nyay yatra In Maharashtra : 17 मार्चला मुंबईच्या शिवाजी पार्कवर होणार जाहीर सभा, सभेला उद्धव ठाकरे सह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता.

मुंबई :- काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी चालू केलेली भारत न्याय जोडो यात्रा, Bharat nyay yatra महाराष्ट्रात दाखल होणार असून नंदुरबार पासून तिची सुरुवात होणार आहे. आणि 16 मार्चला मुंबईत दाखल होणार असून 17 मार्चला जाहीर सभा मुंबईच्या दादर मधील छत्रपती शिवाजी पार्क (शिवाजी पार्क) जाहीर सभा होणार आहे या सभेत उद्धव ठाकरे Uddhav Thackeray सह महाविकास आघाडीचे मुख्य नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसे निमंत्रणही काँग्रेस कोर कमिटीने दिले आहे.

कशाप्रकारे मार्ग असणार आहे?

दुपारी 2 वाजता नंदुरबार जिल्ह्यात ते येतील. 13 मार्चला धुळे व मालेगाव, 14 मार्चला नाशिक, 15 मार्च रोजी पालघर, ठाणे व 16 मार्च रोजी मुंबईत मुक्काम होईल. 17 मार्चला शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत यात्रेचा समारोप होणार आहे. या वेळी लोकसभेचे रणशिंगही फुंकले जाईल. या यात्रेचा राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या जागांवर प्रभाव पडणार असल्याचा दावा काँग्रेस नेते करत आहेत. यात उत्तर महाराष्ट्रातील 4, पालघर- ठाणे- कल्याण असे 3 आणि मुंबईतील 6 जागांचा समावेश आहे. Rahul Gandhi In Maharashtra

राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेसाठी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांना निमंत्रण दिले आहे. प्रकाश आंबेडकरांनाही उपस्थित राहण्यासाठी गळ घातली जाणार असल्याचे समजते. तसेच नाशिक येथील येवला येथे होणा-या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे उपस्थित राहणार आहेत. तसेच ते या ना यात्रेतही सहभाग होणार असल्याचे सांगितले जात आहे. Rahul Gandhi In Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0