Uncategorized
Trending

Manoj Jarange Patil : हिम्मत असेल तर उपमुख्यमंत्री यांनी माझ्या शेजारी आठ दिवस उपोषणाला‌ बसावे ; मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil SIT Enquiry : म्हणून जरांगे पाटील यांचे एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे दिले होते निर्देश

छत्रपती संभाजी नगर :- मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation मिळावे याकरिता अमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, हिम्मत असेल तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माझ्या शेजारी आठ दिवसा करिता उपोषणाला बसावे यावेळी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावरही निशाणा साधला आहे. माझी आणि फडणवीस यांच्या झोपली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उगीचच मध्ये पडण्याची भावना व्यक्त केली.

फडणवीस यांना आपल्यासोबत उपोषणाला बसण्याचे आव्हान दिले. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil सध्या परभणीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी एकाच दिवशी 5 ठिकाणी संवाद बैठका घेतल्या.ते म्हणाले की, माझे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खुले आव्हान आहे. त्यांनी हिंमत असेल तर 8 दिवस माझ्याशेजारी बसून उपोषण करावे. मग त्यांना कळेल उपोषण काय असते, हवा कुठून बाहेर जाते व कुठून श्वास घ्यावा लागतो. वजन कमी करायचे असेल तर या आणि माझ्यासोबत उपोषणाला बसा.

मनोज जरांगे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समाचार घेतला. माझी व देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली असताना एकनाथ शिंदे उगीचच मध्ये पडले. माझे मनोज जरांगेंशी कोणतेही देणेघेणे नाही. मी अशांचा करेक्ट कार्यक्रम करतो असे ते म्हणाले. पण आता मराठा समाजच आता असे बोलणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल. शिंदेंची मराठा समाजात इज्जत होती. पण त्यांनी समाजाला काय दिले? असे जरांगे म्हणाले.

शिंदेंचा एकही शब्द खाली पडू दिला नाही

मी मरेपर्यंत माझ्या समाजबांधवांची साथ देईल. मी सगेसोयऱ्यांची मागणी सोडणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमच्याएवढा सन्मान कुणीच दिला नाही. त्यांनी 30 दिवस मागायचे आणि आम्ही त्यांना 40 दिवस द्यायचे. त्यांनी 2 महिने मागायचे आणि आम्ही अडीच महिने द्यायचे. आम्ही त्यांचा एकही शब्द खाली पडू दिला नाही. पण सरकारने आरक्षण दिले नाही. त्यांनी 10 टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली. त्यानंतरही मराठा समाजाला आजही एकनाथ शिंदेच आरक्षण देऊ शकतात असे वाटते,असे ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला हिंसक वळन लागेल राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधिमंडळात करण्यात आली होती. त्यानुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी SIT चौकशी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक शहराचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0