मुंबई

Ramdas Athawale Demanded That Mumbai Central Railway Station Be Renamed : मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनलचे नाव बदलणार का? रामदास आठवले यांनी ही मागणी केली

•मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनलचे नामकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने करावे, अशी मागणी आरपीआय (ए) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.

मुंबई :- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या एक्स वर ट्विट करत म्हणाले की, लवकरच मुंबई सेंट्रल चे नाव बदलण्यात यावे यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली आहे. दरवर्षी सहा डिसेंबर आणि 14 एप्रिल ला दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी किंवा बाबासाहेब आंबेडकर असे नाव द्यावे अशी मागणी आंबेडकर अनुयायांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे.

परंतु रामदास आठवले यांनी आता मुंबई सेंट्रल कडे आपला मोर्चा वळवत मुंबई सेंट्रल चे नामकरण करून त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्या संदर्भातले आज बैठक झाली असून लवकरच प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे या बैठकीतून सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच कल्याण पूर्वेला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणाकृती पुतळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे रामदास आठवले यांनी आपल्या कविता च्या स्टाईलने कौतुक केले आहे.

मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनलला महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे. त्यांनी ‘एक्स’ वर लिहिले की, ‘आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात राज्य सरकारचा प्रस्ताव रेल्वेमंत्र्यांकडे पाठवण्याचा निर्णय घ्यावा.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0