पुणे

Pune Police Good Work | येमेन दूतावासाकडून कोंढवा पोलिसांचे अभिनंदन : जागतिक पटलावर पुणे पोलिसांचा गौरव – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
  • पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून कोंढवा पोलिसांना बक्षीस जाहीर

पुणे, दि. २८ फेब्रुवारी, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Police Good Work | Kondhwa Police congratulated by Yemen Embassy: Pune Police’s glory on the global stage – Police Commissioner Amitesh Kumar

परदेशातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची फसवणूक करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकणाऱ्या कोंढवा Kondhwa Police Station पोलिसांचे येमेन Yemen Embassy India दूतावासाकडून अभिनंदन करण्यात आले आहे. येमेन देशाचे भारतातील दूतावास कार्यालयाचे अधिकारी डॉ. अनेस हसन यांनी कोंढवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे Sr.Pi. Santosh Sonvane यांचे आभार मानत पुणे पोलिसांच्या कार्याचा गौरव केला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Amitesh Kumar यांनी कोंढवा पोलिसांच्या दर्जेदार कामगिरीचे कौतुक करत बक्षीस जाहीर केले आहे. Pune Police Good Work

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून कोंढवा पोलिसांना बक्षीस जाहीर

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Amitesh Kumar यांनी महाराष्ट्र मिरर प्रतिनिधिशी संवाद साधताना सांगितले कि, कोंढवा पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मी त्यांना बक्षीस जाहीर करणार आहे. विदेशी नागरिकांची सुरक्षितता करणे हे पुणे पोलिसांचे कर्तव्यच आहे आणि पुणे पोलीस सक्षमपणे हि कामगीरी करत आहेत. येमेन दूतावासाकडून पुणे पोलिसांचा गौरव होणे हि निश्चितच कौतुकास्पद आहे.

कोंढवा भागात राहणा-या परदेशी नागरिक सालेह ओथमान एहमद, (52 वर्षे) मुळ रा. एमेन देश हे त्याचे पत्नीच्या उपचारासाठी पुण्यात आले होते. ते 8 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी आशिर्वाद चौकात त्याचे पत्नीसह पायी जात असताना चार चाकी होंन्डा सिटी गाडी त्याच्या जवळ येऊन उभी करुन सदर गाडीतील इसम हे त्याच्याशी अरबी भाषेत बोलुन ते पोलीस असल्याचे सांगीतले व तुमच्याकडे असणा-या वस्तूंची तसेच तुमच्या ओळखपत्राची पडताळणी करायची आहे असे सांगून, जवळ बोलावले. त्यावेळी त्याने त्याचे ओळखपत्र दाखवल्यासारखे केले. त्यावेळी परदेशी नागरिक घाबरुन गाडीतील व्यक्ती पोलीस असल्याबाबत विश्वास बसल्याने, त्यांनी खिशातील, कागदपत्रे त्याला दाखवत असताना, सोबत खिशातील पैसे देखील त्याला दिले, त्यावेळी गाडीतील व्यक्तीने कागदपत्रांचा व पैशाचा नाकाने वास घेवून, तपासात असल्याचे दाखवले. काही समजायच्या आत परदेशी नागरिकाकडुन सौदी 500 रियाल, 3 हजार अमेरीकन डॉलर, 53 हजार भारतीय रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी करुन पळुन गेले होते.

Pune Crime News

त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे भादवि कलम420,406,419,171,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यापासून सुमारे 10 तास 30 मिनिटांचा कालावधी हा 600+ सीसीटीव्ही फुटेज तपासून व पुणे ते दमण तसेच परत पुणे असे एकूण 750 km चे अंतर पाठलाग करून आरोपितांना ताब्यात घेण्यात आले होते. Pune Police Good Work

आरोपी 1) सिंकदर अली खान, 44 वर्षे, राजदूत हॉटेल जवळद्व तंगपुरा दक्षिण दिल्ली, 2) करिम फिरोज खान, (29 वर्षे), रा.१८ तिसरा मजला आय बलॅक कस्तुरबा नगर लाजपतनगर साऊथ दिल्ली 3) इरफान हुसेन हाशमी, (44 वर्षे), राजदूत हॉटेल जवळ, जंगपुरा दक्षिण दिल्ली 4) मेहबुब अब्दुल हमदी खान, (59 वर्षे) राजदूत हॉटेल जवळ, जंगपुरा दक्षिण दिल्ली यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आरोपी यांच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्याच्याकडुन 1) कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे भा.दं. वि. कलम 170,419,471,420,34 २) कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे भा.दं.वि.कलम 420,406,419,171,34 प्रमाणे दाखल असणारे 2 गुन्हे केल्याचे उघड करुन त्याच्याकडुन दोन्ही गुन्हयातील तीन हजार अमेरीकन डॉलर, पाचशे सौदी रियाल, 53 हजार रोख रक्कम, व गुन्हा करण्यासाठी वापरलेली 2 लाख किंमत होन्डा सिटी कार ही जप्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0