Mumbai Crime News : देशी बनावटीचे रिव्हॉल्वर,02 जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी केले अटक
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीस बंदूक (अग्निशस्त्रासह) गुन्हे शाखा, मुंबईकडून अटक
मुंबई :-मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, मुंबई येथे एक इसम रिव्हॉल्वर अग्नीशस्त्र विक्री करण्याकरीता येणार असल्याची खात्रीशीर माहिती (27 फेब्रुवारी) रोजी कक्ष 3, गुन्हे प्रकटीकरण शाखा मुंबई कार्यालयास प्राप्त झाली. प्राप्त माहितीच्या आधारे कक्ष 3 च्या पोलीस पथकाने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकजवळ, नथानी हाईट्स समोरील बसस्टॉप येथे सापळा लावून, संशयीत मिळून येताच, त्यास शिताफिने ताब्यात घेतले. लागलीच त्याची अंगझडती घेता, त्याच्याकडे 01 देशी बनावटीचे रिव्हॉल्वर (सिक्सर) व 02 जिवंत काडतुसे/राऊंड मिळून आले. अधिक चौकशी करता, त्याचेविरुध्द नागपाडा पोलीस ठाणे, मुंबई चे अभिलेखी दुखापत व मारामारीचे अनेक गुन्हे नोंद असल्याचे समजले. Mumbai Crime News
त्याच्याकडे बंदूक (अग्निशस्त्र )बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने, नमुद अग्निशस्त्र व काडतुसे जप्त करुन आरोपी फारुक जाफर शेख, (45 वर्षे), कामाठीपुरा, मुंबई सेंट्रल, मुंबई आणि मुळ गांव लखनऊ, उत्तरप्रदेश याचेविरुध्द कलम 3,25 शस्त्र अधिनियम सह कलम 37 (1) (अ), 135 महाराष्ट्र पोलीस कायदा (नागपाडा पो. ठाणे सी.सी.टी.एन. एस.) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हयात आरोपी यास अटक करण्यात आली असून, गुन्हयाचा पुढील तपास कक्ष 03 कडून करण्यात येत आहे. कक्ष 3, गुन्हे प्रकटीकरण शाखा मुंबई यांनी केलेल्या कामगिरीमुळे आरोपीकडून भविष्यात घडणाऱ्या गंभीर अपराधांना प्रतिबंध करण्यात यश आले आहे. Mumbai Crime News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर Vivek Phansalkar, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती Deven Bharti, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मुंबई लखमी गौतम Lakhmi Gautam, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे व सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रकटीकरण (मध्य) चेतन काकडे यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष- 3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर मुजावर, पोलीस हवालदार विनोद परब, वैभव गिरकर, पोलीस शिपाई विकास चव्हाण, यल्लप्पा तांबडे यांनी पार पाडली आहे. Mumbai Crime News